No awards, please! या स्टार्सचा नाही पुरस्कारांवर विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 18:42 IST2017-01-23T13:12:59+5:302017-01-23T18:42:59+5:30

डिसेंबर महिना आली की, बॉलिवूडला वेध लागतात ते, पुरस्कार सोहळ्याचे. चित्रविचित्र पोशाखात रेड कार्पेटवर उतरणाºया बॉलिवूडच्या  त्याच- त्या ग्लॅमरस ...

No awards, please! No rewards for these stars! | No awards, please! या स्टार्सचा नाही पुरस्कारांवर विश्वास!

No awards, please! या स्टार्सचा नाही पुरस्कारांवर विश्वास!

सेंबर महिना आली की, बॉलिवूडला वेध लागतात ते, पुरस्कार सोहळ्याचे. चित्रविचित्र पोशाखात रेड कार्पेटवर उतरणाºया बॉलिवूडच्या  त्याच- त्या ग्लॅमरस नट्या, त्यांच्याच तोडीला तोड असलेले तेच ते हँडसम नट, त्यांचे एकापेक्षा एक हटके स्टेज परफॉर्मन्स, शो होस्ट करणाºयांचे व्हेज-नॉनव्हेज जोक्स आणि यादरम्यान  पुरस्काराच्या बाहुल्या घेऊन मिरवणारे विनर्स....सगळे कसे भारावणारे वातावरण. कुठल्याशा चॅनलवर हा सोहळा रंगतो. प्रेक्षक मायबाप घरातल्या टीव्हीवर जाहिरातींचा मारा सहन या सोहळ्याचा आनंद घेतो आणि अवार्ड शो संपतो. अवार्ड शो कुठलाही असो, शाहरूख, सलमान, करण जोहर हे नेहमीच चेहरे या सोहळ्यांत दिसणारच आणि आमिर खान सारखे काही मोजके सेलिब्रिटी या शोमध्ये नसणारच, हे जणू आताश: समीकरण झाले आहे. आमिर बॉलिवूडच्या कुठल्याच पुरस्कार सोहळ्यात जात नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. दोन दशकांपूर्वी आमिरने बॉलिवूडमध्ये हा ट्रेंड आणला आणि आता बॉलिवूडचे अनेक स्टार्स आमिरच्या या वाटेने चालताना दिसत आहेत. अवार्ड्स शोकडे ढुंकूनही न पाहणाºया अशाच काही बॉलिवूड स्टार्सबद्दलची माहिती या लेखात...

आमिर खान



आमिर खानने त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिलेत. त्याच्या बºयाच सिनेमांना अनेक बॉलिवूड पुरस्कार सोहळ्यात नामांकने मिळाली, पुरस्कारही मिळालेत. पण आमिरचे म्हणाल तर, १९९२ नंतर कुठल्याच अवार्ड शोच्या स्टेजवर तो दिसला नाही. १९९२ मध्ये आमिर खानचा ‘जो जिता वही सिंकदर’ हा सिनेमा प्रचंड गाजला. याचवेळी अनिल कपूरचा ‘बेटा’ हा सिनेमाही रिलीज झाला होता. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्याला मिळेल, असा आमिरला पक्का विश्वास होता. पण झाले भलतेच, हा पुरस्कार अनिल कपूरच्या वाट्याला गेला.  ही बाब आमिरच्या प्रचंड जिव्हारी लागली. यानंतर पुढच्याच वर्षी आमिरचा ‘हम है राही प्यार कें’ आला. १९९५ मध्ये ‘रंगीला’ आला. पण आमिरच्या अभिनयाची एकाही पुरस्कार सोहळ्यात दखल घेतली गेली नाही. यानंतर मात्र आमिरचा पुरस्कार सोहळ्यांवरून विश्वास उडाला तो कायमचा. माझा कुठल्याही पुरस्कार सोहळ्यावर विश्वास नाही. त्यामुळे मी त्यापासून लांब राहणेच पसंत करतो, असे आमिर म्हणतो, ते त्याचमुळे.

इमरान हाश्मी



आमिर प्रमाणेच बॉलिवूडचा ‘सीरिअल किसर’ इमरान हाश्मी याचाही बॉलिवूडमध्ये रंगणाºया पुरस्कार सोहळ्यांवर विश्वास नाही. इमरानने ‘मर्डर’,‘गँगस्टर’,‘डर्टी पिक्चर’,‘शांघाय’ असे अनेक ब्लॉकबस्टर दिलेत. पण अवाडर््स फंक्शनचे म्हणाल तर इमरान कायम यापासून दूर राहिला. अलीकडे एका मुलाखतीत इमरानने यामागचे कारण सांगितले होते. अवार्ड्स शोमध्ये काहीही ‘रिअल’ नसते. मी अवार्ड्स शोमध्ये परफॉर्म केला तर माझा अवाडर््स पक्का, असे मला जेव्हा कळले तेव्हापासून पुरस्काराबद्दलची माझ्या मनातील इच्छा कायमची संपली. माझा चित्रपट पाहायला लोक पैसे खर्च करून येतात, हा माझ्यासाठी पुरस्कार आहे, असे इमरानने म्हणाला होता.

कंगना राणौत



मी यापुढे कुठल्याही अवार्ड शोमध्ये जाणार नाही, असे यावर्षी कंगना राणौतने जाहिर करून टाकले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. सन २०१४ मध्ये ‘क्वीन’मधील भूमिकेसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कारांवरही तिने नाव कोरले गेले. पण याचदरम्यान  कंगनाचा बॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यांवरून विश्वास उडाला तो उडालाच. मी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा मला अनेक पुरस्कार मिळाले. नॅशनल अवार्डही मिळाला. पण यानंतरही सुमारे दोन वर्षे मला काही काम मिळाले नाही. कलाकार अवार्ड शोला हजर राहणार आहे की नाही, हे जाणून घेतल्यानंतर त्याला पुरस्कार द्यायचा की नाही, हे ठरवले जात असेल तर मी असे पुरस्कार स्वीकारण्यात अजिबात रस नाही, असे कंगनाने यावेळी जाहिर करून टाकले.

 अजय देवगण



अभिनेता अजय देवगणने ‘जख्म’ आणि ‘दी लीजेंड आॅफ भगत सिंह’ या चित्रपटासाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले. पण आमिर प्रमाणेच अजय सुद्धा कुठल्याच अवार्ड शोमध्ये दिसला नाही. गेल्या १५ वर्षांत मी कधीच कुठल्या अवार्ड शोला गेलेलो नाही. बॉलिवूडचे अवार्ड म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. निव्वळ पैसा कमवण्याचा धंदा आहे. अवार्ड शोचे आयोजक टीव्ही वाहिन्यांशी सेटिंग करतात. म्हणून बड्या बड्या स्टार्सला याठिकाणी बोलवले जाते. जो अवार्ड शोमध्ये येईल, परफॉर्म करेल त्याला पुरस्कार मिळेल,असे साधेसोपे गणित आहे. त्यामुळे माझा यावर विश्वास नाही, असे अजयने अलीकडे एका मुलाखतीत अगदी उघड उघड सांगितले होते.

अक्षय कुमार



आपल्या दोन दशकांच्या करिअरमध्ये अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटांनी बॉक्सआॅफिसवर शंभर कोटींचा गल्ला जमवला. पण अक्षयच्या कुठल्याही चित्रपटाला अद्यापही लोकप्रीय चित्रपटाचा अवार्ड मिळालेला नाही. याचे कारण म्हणजे, अक्षय कुठल्याच अवार्ड शोमध्ये जात नाही. सर्व अवार्ड शो म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. तुम्हाला पुरस्कार मिळेल. पण अर्धे पैसे तुम्हाला खर्चावे लागतील, असे अनेक पुरस्कार सोहळ्यांच्या आयोजकांनी मला बोलून दाखवले आहे. अशा सोहळ्यांत मी का जाऊ? असा अक्षयचा सवाल आहे, तो यामुळेच.

नवाजुद्दीन सिद्दीकी



‘कहानी’,‘गँग आॅफ वासेपूर’, ‘तलाश’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय साकारणारा नवाजुद्दीन सिद्दीकीही आमिर, अजय व अक्षयच्याच रांगेतला. बॉलिवूडचे अवार्ड प्रतिभा पाहून नाही तर तोंड पाहून दिले जातात. अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे योगदान दिलेय. पण त्यांना कधीच कुठल्या अवार्डने गौरविले गेले नाही, असे नवाजुद्दीनचे स्पष्ट मत आहे. याच कारणामुळे कुठल्याही अवार्ड शोमध्ये नवाजुद्दीन दिसत नाही.

 जॉन अब्राहम



बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार जॉन अब्राहम याला अवार्ड शोचे वावडे आहे. त्याची यामागची थिअरी एकदम क्लिअर आहे. अवार्ड सेरिमनी टीआरपी बेस्ड असतात. मला असे इव्हेंट सर्कससारखे वाटातात. मी अवार्ड जिंकणार आहे, असे मला एकदा सांगितले. पण जर मी परफॉर्म करणार असेल तर तो मला मिळेल, ही अटही सोबत होती. अशा अवार्ड शोला न गेलेलेच बरे, असे जॉन म्हणतो.

Web Title: No awards, please! No rewards for these stars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.