"ना शाहरुख, ना सलमान आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही", CHYD बाबत निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "ते स्वत: हूनच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:33 IST2025-07-14T17:32:54+5:302025-07-14T17:33:16+5:30

मराठीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, सोनम कपूर, रोहित शेट्टी, अनुष्का शर्मा असे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने याबाबत भाष्य केलं. 

nilesh sable talk about chala hawa yeu dya said we did not invite salman khan shah rukh khan in our show | "ना शाहरुख, ना सलमान आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही", CHYD बाबत निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "ते स्वत: हूनच..."

"ना शाहरुख, ना सलमान आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही", CHYD बाबत निलेश साबळेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला- "ते स्वत: हूनच..."

'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कॉमेडी शोचं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, या पर्वात निलेश साबळे दिसणार नाही. काही पर्सनल कारणांमुळे निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. 'चला हवा येऊ द्या' हा शो प्रचंड गाजला. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या शोमध्ये हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, सोनम कपूर, रोहित शेट्टी, अनुष्का शर्मा असे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत निलेश साबळेने याबाबत भाष्य केलं. 

निलेश साबळेने नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "जेव्हा कार्यक्रम नवा होता तेव्हा तो एका पीकला गेला होता. खूप गाजला होता. संपूर्ण भारतात, परदेशात तेव्हा तो कार्यक्रम बघितला जायचा. सोनम कपूर या पहिल्या हिंदी कलाकार ज्या या कार्यक्रमात आल्या. त्यानंतर शाहरुख खान त्यांच्या फॅन सिनेमासाठी आले होते. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की आम्ही त्यांना बोलवायचो, असं बऱ्याच वेळेला लोक म्हणतात. तर तसं कधीच नव्हतं. आम्ही कधीच कोणाला बोलवलं नाही. आम्ही कधीच कोणाला अॅप्रोच झालो नाही. त्यांचं प्रोडक्शन हाऊस झी मराठीकडे वाहिनीकडे यायचं". 

"आत्तापर्यंत चला हवा येऊ द्यामध्ये जेवढे हिंदी सिनेमे प्रमोट केले गेले त्यापैकी कोणत्याही सिनेमाला आम्ही बोलवलेलं नव्हतं. कारण, चला हवा येऊ द्या हा कार्यक्रमच तसा होता की तुम्हाला यायचंय तर तुम्ही स्वत:हून येऊ शकता. शाहरुख, सलमान किंवा आणखी कोणी असेल त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने स्वत: संपर्क साधला होता. एक गोष्ट अशी की आम्ही प्रयत्न करायचो की त्यांनी मराठीत बोललं पाहिजे. सगळ्यांना पूर्ण वेळ मराठी बोलता यायचं नाही. तरीदेखील आम्ही काही प्रश्न मराठीतच विचारायचो. त्यांना आधी सांगितलं जायचं की आम्ही मराठीत विचारू कारण कार्यक्रमच मराठी आहे. पण, जिथे त्यांना नाही जमायचं तिथे आम्ही थोडं हिंदी बोलायचो. पण तेदेखील मराठीत बोलायचा प्रयत्न करायचे. त्यांना मराठी संस्कृतीत मिसळून जायलाही आवडायचं", असंही पुढे निलेश साबळे म्हणाला.  

Web Title: nilesh sable talk about chala hawa yeu dya said we did not invite salman khan shah rukh khan in our show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.