रितेश-जेनेलियाच्या घरी नवा पाहुणा
By Admin | Updated: June 2, 2016 01:28 IST2016-06-02T01:28:05+5:302016-06-02T01:28:05+5:30
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा-देशमुखच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. जेनेलियाने बुधवारी सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

रितेश-जेनेलियाच्या घरी नवा पाहुणा
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा-देशमुखच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. जेनेलियाने बुधवारी सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला. जेनेलिया आणि रितेशला या आधी दोन वर्षांचा मुलगा आहे. रितेशने ट्विटरवरून ही गोड बातमी दिली. रितेशने ट्विटमध्ये म्हटले आहे की, माज्या आई-वडिलांनी नुकतीच मला एक भेटवस्तू दिली आहे. ती भेटवस्तू म्हणजे माझा नवीन भाऊ. आता माझी सगळी खेळणी त्याची असणार आहेत. - रियान. रितेश आणि जेनेलिया इंडस्ट्रीमधील एक क्युट कपल मानले जाते. २००३ पासून ते दोघे नात्यात आहेत. २०१२ साली त्यांनी लग्न केले. पालक होणे ही आयुष्यातील सगळ्यात चांगली गोष्ट असते. तुमच्या मुलासोबतचा प्रत्येक क्षण तुम्ही अनुभवला पाहिजे. मूल लहान असताना तुम्ही काय बोलता हे तुमच्या मुलाला कळत नसतं. पण नंतर अशी वेळ येते की तो काय बोलतो हे आपल्याला कळत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करण्याची गरज आहे असे रितेशने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.