नर्गिस फाखरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By Admin | Updated: October 5, 2016 13:38 IST2016-10-05T13:17:02+5:302016-10-05T13:38:21+5:30
2004 मधील हा व्हिडीओ आहे ज्यामध्ये नर्गिसने अमेरिकेतील 'नेक्स्ट टॉप मॉडेल'साठी ऑडिशन दिलं होतं

नर्गिस फाखरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नर्गिसचा हा व्हिडीओ मॉडेलिगंच्या सुरुवातींच्या दिवसांमधील आहे. 2004 मधील हा व्हिडीओ आहे ज्यामध्ये नर्गिसने अमेरिकेतील 'नेक्स्ट टॉप मॉडेल'साठी ऑडिशन दिलं होतं. सोशल मिडीयावर सेलिब्रेटींचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत त्याचप्रमाणे आता नर्गिसचा व्हिडीओ समोर आला आहे.
2004 मध्ये अमेरिकेत पार पडलेल्या 'नेक्स्ट टॉप मॉडेल' या स्पर्धेत नर्गिस फाखरी सहभागी झाली होती. नर्गिसने दोन राऊंड पार केले होते पण फायनलमध्ये पोहोचू शकली नव्हती. स्ट्रगलिंगच्या दिवसांमध्ये फायलनमध्येही पोहोचू न शकणा-या नर्गिसने बॉलिवूडमध्ये मात्र आपली ओळख निर्माण केली आहे.