‘चौर्य’ची रहस्यमय कथा ५ आॅगस्टला उलगडणार

By Admin | Published: August 3, 2016 02:28 AM2016-08-03T02:28:42+5:302016-08-03T02:28:42+5:30

चौथऱ्यावर महिलांना प्रवेश न देण्यावरून शनिशिंगणापूर हे देवस्थान चर्चेत आलं होतं.

The mysterious story of 'Charya' will unfold in August 5 | ‘चौर्य’ची रहस्यमय कथा ५ आॅगस्टला उलगडणार

‘चौर्य’ची रहस्यमय कथा ५ आॅगस्टला उलगडणार

googlenewsNext


चौथऱ्यावर महिलांना प्रवेश न देण्यावरून शनिशिंगणापूर हे देवस्थान चर्चेत आलं होतं. आता पुन्हा या गावाची चर्चा ‘चौर्य’ या चित्रपटामुळे रंगत आहे. कारण या चित्रपटामध्ये एक आगळंवेगळं गाव आहे. त्या गावात घरांना दरवाजे नसतात. तिथल्या लोकांची श्रद्धा असते की, चोरी करणाऱ्यांना देव शिक्षा करतो. परंतु, एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहोचतो. अंगावर शहारे आणणाऱ्या या रहस्यमय घटनेतून सुरू होतो. चोर आणि श्रद्धेचा शोध या विषयाभोवती चित्रपटाचे कथन गुंफण्यात आले आहे. नवलाखा आटर््स व होली बेसिल कंबाइनच्या नीलेश नवलाखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राजन आमले हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आटर््स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. या चित्रपटात किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, दिग्विजय रोहिदास, प्रदीप वेलणकर, दिनेश लता शेट्टी जयेश सांघवी, तीर्था मुरबाडकर, आरजे श्रुती या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून हा चित्रपट ५ आॅगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The mysterious story of 'Charya' will unfold in August 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.