मुंबई हेच माझं घर : पीसी

By Admin | Updated: September 2, 2016 03:24 IST2016-09-02T03:24:48+5:302016-09-02T03:24:48+5:30

प्रि यांका चोप्रा ही अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीजनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. बॉलीवूडमध्ये अशी अफवा पसरवण्यात आली आहे की, प्रियांका चोप्रा

Mumbai is my home: PC | मुंबई हेच माझं घर : पीसी

मुंबई हेच माझं घर : पीसी

प्रि यांका चोप्रा ही अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीजनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. बॉलीवूडमध्ये अशी अफवा पसरवण्यात आली आहे की, प्रियांका चोप्रा ही आता लॉस एंजलिसलाच स्थायिक होणार आहे. मात्र, आज खुद्द प्रियंकानेच ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. ‘मुंबई हेच माझं घर आहे. मुंबई सोडून मी कुठं जाणार? इथंच माझ्या करिअरला, जडणघडणीला सुरुवात झाली. मुंबईविषयी मला विशेष आस्था आहे. जी इतर कुठेही मला अनुभवायला मिळणार नाही,’ असे तिने स्पष्ट केले. पीसीच्या जवळच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, काहीही प्लॅन पीसीचा नाही. तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे की, ‘आय रिअली वेक अप टू सच अम्युझिंग न्यूज समटाइम्स. आय अ‍ॅम फिल्मिंग क्वांटिको इन माय होम इज मुंबई. नो एलए इन द पिक़’

Web Title: Mumbai is my home: PC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.