सुनील गावसकर यांच्यासोेबत मृणालने घेतले डिनर
By Admin | Updated: February 28, 2016 04:21 IST2016-02-28T03:23:59+5:302016-02-28T04:21:34+5:30
फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट यांचे फार जवळचे नाते आहे, असे म्हटले जाते. फिल्मस्टार्स आणि क्रिकेटर्स एकमेकांचे चांगले फ्रेंड्स असल्याची अनेक उदहारणे आपल्याकडे आहेत.

सुनील गावसकर यांच्यासोेबत मृणालने घेतले डिनर
फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट यांचे फार जवळचे नाते आहे, असे म्हटले जाते. फिल्मस्टार्स आणि क्रिकेटर्स एकमेकांचे चांगले फ्रेंड्स असल्याची अनेक उदहारणे आपल्याकडे आहेत. जेवढे ग्लॅमरस फिल्मस्टार्स असतात, तेवढेच ग्लॅमर क्रिकेटर्सनाही असते. आता पाहा ना, आपली मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिने नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा एक काळ गाजविलेले क्रिकेटर सुनील गावसकर यांच्यासोबत डिनर घेतले. मृणाल या डिनरसाठी एवढी उस्तुक होती, की तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘अमेझिंग डिनर विथ सुनील गावसकर’ असे ती सध्या म्हणत आहे. या डिनर वेळी मृणालने सुनील गावसकर यांच्यासोबत हॅपी अन फन मोमेंट स्पेंड केल्याचे ती सांगते. तर, सुनील गावसकर हे चार्मिंग पर्सन असल्याचेदेखील तिने शेअर केले आहे. या अनफर्गेटेबल डिनरचे फोटो तिने सोशल साइटवर अपलोड केले असून, तिच्या चेहऱ्यावरील हॅपिनेसच त्यातून दिसतोय.