"अतिशय गर्विष्ठ, इतर मुलींची खिल्ली उडवायची", शाहिदच्या बायकोबद्दल क्लासमेटचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:24 IST2025-04-05T13:23:15+5:302025-04-05T13:24:27+5:30

मीरा राजपूतसोबत कॉलेजमध्ये शिकणाऱ्याने केली पोलखोल, म्हणाला...

mira rajput shahid kapoor s wife was very arrogant in college says reddit user | "अतिशय गर्विष्ठ, इतर मुलींची खिल्ली उडवायची", शाहिदच्या बायकोबद्दल क्लासमेटचा खुलासा

"अतिशय गर्विष्ठ, इतर मुलींची खिल्ली उडवायची", शाहिदच्या बायकोबद्दल क्लासमेटचा खुलासा

अभिनेता शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput) त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी छोटी आहे. तरी दोघांची जोडी एकदम छान वाटते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघंही अगदी सुखी संसार करत आहेत. मीरा राजपूतचंबॉलिवूडशी काहीही कनेक्शन नाही. तरी तिने या ग्लॅमरच्या दुनियेत फक्त शाहीदची पत्नी नाही तर स्ट्राँग वुमन म्हणून स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण नुकतंच मीरा राजपूतवर रेडिट सोशल मीडिया साईटर टीका होत आहे. तिच्या कॉलेजमधील एका मुलाने मीरा किती गर्विष्ठ आहे हे सत्य सर्वांना सांगितलं आहे.

रेडिट या सोशल मीडिया साईटवर एक युजर लिहितो, "मी इंडिया आर्ट फेअरमध्ये गॅलर बूथवर काम करत होतो आणि मीराही तिथेच होती. आम्ही एकमेकांना पाहिलं आणि मी तिच्याकडे बघून स्माईल दिली. तर मीराने अतिशय कुत्सितपणे डोळे फिरवले. मी मीरासोबत लेडी श्री राम कॉलेजमध्ये होतो. ती अतिशय गर्विष्ठ आणि दुष्ट आहे. ती काहीसे गरीब असलेल्या इतर मुलींची खिल्ली उडवायची. त्यांचा कपडे, केस आणि इंग्रजी बोलण्याच्या टोनवरुन त्यांची मस्करी करायची."

युजर पुढे लिहितो,"मीरा गर्विष्ठ असल्याचं आणखी एक उदाहरण आहे. माझी मैत्रीण जी दिल्लीतील एरोसिटीमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करत होती. मीरा आणि शाहिद त्या हॉटेलमध्ये जर्सी सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी थांबले होते. माझी मैत्रीण मला म्हणाली की मीराने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत दीड हजार रुपयांच्या बिलवरुन वाद घातला. तसंच ती त्यांच्यासोबत अतिशय उर्मटपणे वागली. याउलट शाहीद मात्र विनम्र होता. त्याने कर्माचाऱ्यांसोबत फोटोही काढले. "

Web Title: mira rajput shahid kapoor s wife was very arrogant in college says reddit user

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.