ऑस्करच्या स्पर्धेत भारतातर्फे मराठमोळा 'कोर्ट'
By Admin | Updated: September 23, 2015 17:23 IST2015-09-23T17:23:29+5:302015-09-23T17:23:29+5:30
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाद मिळवणारा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मराठी चित्रपट 'कोर्ट' आता ऑस्करच्या स्पर्धेत उतरला आहे.

ऑस्करच्या स्पर्धेत भारतातर्फे मराठमोळा 'कोर्ट'
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाद मिळवणारा आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मराठी चित्रपट 'कोर्ट' आता ऑस्करच्या स्पर्धेत उतरला आहे. ऑस्करमधील परदेशी भाषा विभागात भारताकडून 'कोर्ट' या चित्रपटाला अधिकृत नामांकन देण्यात आले आहे.
भारतातर्फे ऑस्करसाठी बजंरगी भाईजान, हैदर, बाहुबली, पीके या चित्रपटांची नावे चर्चेत होती. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्करच्या नामांकनासाठी निवड समिती नेमली होती. अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर या समितीचे प्रमुख असून सुमारे ३० चित्रपटांमधून मराठी चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. चैतन्य ताम्हणे या तरुण दिग्दर्शकाने 'कोर्ट' हा चित्रपट साकारला असून आरोपी, बचाव पक्ष व सरकारी वकील, न्यायाधीश यांच्या दृष्टीकोनातून भारताच्या न्यायव्यवस्थेवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. कोर्ट या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.