मराठमोळी पूजा हेगडे ‘मोहेंजोदडो’मध्ये हृतिकसोबत
By Admin | Updated: January 13, 2016 02:39 IST2016-01-13T02:39:39+5:302016-01-13T02:39:39+5:30
बॉलीवूडमध्ये सध्या मराठमोळी कलाकार आपलं लक अजमवताना दिसत आहे. जसे की नुकताच सई ताम्हणकर व राधिका आपटे यांनी ‘हंटर’ या बॉलीवूड चित्रपटातून जोरदार एन्ट्री केली.

मराठमोळी पूजा हेगडे ‘मोहेंजोदडो’मध्ये हृतिकसोबत
बॉलीवूडमध्ये सध्या मराठमोळी कलाकार आपलं लक अजमवताना दिसत आहे. जसे की नुकताच सई ताम्हणकर व राधिका आपटे यांनी ‘हंटर’ या बॉलीवूड चित्रपटातून जोरदार एन्ट्री केली. तर माधुरी दीक्षित, मुग्धा गोडसे, सोनाली कुलकर्णी, ऊर्मिला मातोंडकर, सोनाली बेंद्रे यांनी तर अक्षरश: बॉलीवूड गाजवले आहे. आणि आता अशाच एका मराठमोळ्या कलाकाराचे आगमन बॉलीवूडमध्ये स्टार हृतिक रोशनसोबत मोहेंजोदडोमधून होत आहे; ती म्हणजे पूजा हेगडे. पूजाने यापूर्वी दक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. तसेच ही मराठमोळी अभिनेत्री २०१० या वर्षीची मिस युनिव्हर्सची उपविजेतीही ठरली आहे. आता ती दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या मोहेंजोदडो या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. हा चित्रपट १२ आॅगस्ट २०१६ रोजी प्रदर्शित होणार आहे. चला तर पाहू या बॉलीवूडमध्ये मराठमोळी कलाकार पूजा हेगडे आपलं स्थान निर्माण करण्यात कितपत यशस्वी ठरते.