मास्तरीणबाई अन् अधिपतीच्या नात्यात येणार नवं वादळ; 'या' अभिनेत्रीची होतीये मालिकेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:02 PM2024-04-30T16:02:22+5:302024-04-30T16:02:46+5:30

Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीला संगीत शिकवायला आलेल्या शिक्षिकेमुळे अधिपती-अक्षराच्या संसारावर होणार परिणाम?

marathi tv serial Tula Shikvin Changalach Dhada saaniya chaudhari new role | मास्तरीणबाई अन् अधिपतीच्या नात्यात येणार नवं वादळ; 'या' अभिनेत्रीची होतीये मालिकेत एन्ट्री

मास्तरीणबाई अन् अधिपतीच्या नात्यात येणार नवं वादळ; 'या' अभिनेत्रीची होतीये मालिकेत एन्ट्री

शिवानी रांगोळे (shivani rangole) आणि ऋषिकेश शेलार (hrishikesh shelar) यांची मुख्य भूमिका असलेल्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने चांगलीच ग्रीप पकडली आहे. ही मालिका एका नव्या ट्रॅकवर वळली असून दिवसेंदिवस ती लोकप्रिय ठरत आहे. यामध्येच आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. मात्र, या नव्या व्यक्तीमुळे मास्तरीणबाई आणि अधिपतीच्या आयुष्यात एक नवं वादळ येणार असल्याचं दिसून येत आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी एक नवी शिक्षिका घरात आल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही संगीत शिक्षिका म्हणजे 'दार उघड बये' मालिकेतील अभिनेत्री आहे.

गेल्या काही दिवसांपासून अक्षरा, अधिपतीने गाणं शिकावं यासाठी अट्टाहास करत होती. त्यासाठी ती भुवनेश्वरीची परवानगीही घेते. त्यानुसार, भुवनेश्वरी, अधिपतीसाठी संगीत शिक्षिकेची नेमणूक करतात. या प्रोमोमध्ये या शिक्षिकेची झलक दाखवण्यात आली आहे.

दरम्यान, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत आता अभिनेत्री सानिया चौधरी (saaniya chaudhari) हिची एन्ट्री होणार आहे. सानियाने 'दार उघड बये' या मालिकेत मुक्ता ही मुख्य भूमिका साकारली होती. 'तुला शिकवीन..' मध्ये सानिया नेमकी कशा प्रकारे भूमिका साकारणार आहे? तिच्या येण्यामुळे अधिपती- अक्षराच्या नात्याला नवं मिळणार का? भुवनेश्वरीचा हा नवा डाव असेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

Web Title: marathi tv serial Tula Shikvin Changalach Dhada saaniya chaudhari new role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.