प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रने घेतली आलिशान गाडी; कुटुंबासह केली पूजा, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:48 IST2025-05-24T10:47:04+5:302025-05-24T10:48:24+5:30

प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओतून दाखवली 'Audi' ची झलक 

marathi singer savaniee ravindrra buy new audi q5 car shared video with fans | प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रने घेतली आलिशान गाडी; कुटुंबासह केली पूजा, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रने घेतली आलिशान गाडी; कुटुंबासह केली पूजा, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

Savaniee Ravindrra : आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी  गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. तेलुगू, तमीळ, मराठी इंडस्ट्रीत तिने तिच्या गायनाने रसिकांना भूरळ घातली.  तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. सध्या सावनी रवींद्र तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. सावनी रवींद्रने नुकतीच एक आलिशान गाडी खरेदी केली आहे.  गायिकेच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालेलं आहे.


आपलं हक्काचं घर आणि गाडी असावं असं प्रत्येकांच स्वप्न असतं. शिवाय प्रत्येकजण त्यासाठी आतोनात मेहनत घेत असतो. अलिकडेच मराठी कलाविशवातील काही कलाकारांनी नवं घर तर कुणी नवी गाडी घेत आपलं स्वप्न साकार केलं. त्यात आता मराठमोळी गायिका सावनी रवींद्रने नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रीय असलेली सावनी रवींद्र अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच नुकतीच सावनीने 'AUDI Q5' ही गाडी खरेदी केली आहे. याचा खास व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. सध्या मार्केटमध्ये या गाडीची किंमत ६६ लाखांच्या घरात आहे.

सावनी रवींद्रने नुकतीच एक नवीन गाडी घेतली आहे. "Manifestation in motion — dreamed it, drove it...., Welcome home AUDI Q5, बाप्पा मोरया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...", असं कॅप्शन देत सावनीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर सावनी रवींद्रच्या या पोस्टची चर्चा सुरु आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये कार्तिकी गायकवाड, समृद्धी केळकर, प्रसाद ओक, सुबोध भावे तसेच माधवी निमकर, अश्विनी महांगडे अशा अनेक कलारांनी तिला शुभेच्छा देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Web Title: marathi singer savaniee ravindrra buy new audi q5 car shared video with fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.