एसटी स्टँडवर गाणाऱ्या महिलेला महेश टिळेकरांनी दिली पैठणी; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:31 PM2021-12-21T16:31:29+5:302021-12-21T16:32:19+5:30

Mahesh tilekar: टिळेकरांनी एसटी स्टँडवर गाणं गाणाऱ्या एका महिलेचा पैठणी साडी देत सत्कार केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर महेश टिळेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

marathi producer and director mahesh tilekar give a gift paithani saree for st stand singer | एसटी स्टँडवर गाणाऱ्या महिलेला महेश टिळेकरांनी दिली पैठणी; कारण...

एसटी स्टँडवर गाणाऱ्या महिलेला महेश टिळेकरांनी दिली पैठणी; कारण...

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर( mahesh tilekar) सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असतात. समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर टिळेकर स्पष्टपणे आणि बिंधास्तपणे आपलं मत मांडत असतात. कलाविश्वात सक्रीय असलेले महेश टिळेकर समाजकार्यातही तितकेच अॅक्टीव्ह आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक कलावंताचा आदर राखणारे महेश टिळेकर यांनी सध्या अशी एक गोष्ट केली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. टिळेकरांनी एसटी स्टँडवर गाणं गाणाऱ्या एका महिलेचा पैठणी साडी देत सत्कार केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर महेश टिळेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात.विशेष म्हणजे याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना प्रसिद्धीही मिळाली आहे. याचंच जिवंत उदाहरण म्हणजे राणू मंडल. एका रेल्वे स्थानकावर लता मंगेशकर यांची गाणी गाणाऱ्या राणू मंडल रातोरात सुपरस्टार झाल्या होत्या. त्यांच्या नंतर अशीच एक महिला प्रकाशझोतात आली आहे. एसटी स्टँडवर गाणं गाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेचा शोध महेश टिळेकर यांनी घेतला आहे. 

काही दिवसांपूर्वी एक अज्ञात गायिकेचा व्हिडीओ महेश टिळेकरांपर्यंत पोहोचला होता. या व्हिडीओमध्ये ही महिला सुरेल आवाजात एसटी स्टँडवर गाणं गात होती. विशेष म्हणजे महेश टिळेकरांनी या महिलेचा शोध घेत तिच्या घरी जाऊन पैठणी साडी देत तिचा सन्मान केला.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या महिलेचं नाव मंगल जावळे असं असून त्या कोल्हाटिन समाजाच्या असल्याचं सांगण्यात येतं. मंगल या दररोज एसटी स्टँडवर गाणी गातात. आणि, त्यातून मिळणाऱ्या १००-२०० रुपयांमध्ये घर चालवतात.

दरम्यान, गाण्याचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेताही त्या हिंदी, मराठी गाणी सहज सुंदररित्या सादर करतात. त्यामुळेच त्यांच्या आवाजाने भारावून गेलेल्या महेश टिळेकर यांनी मंगल यांना पैठणी साडीसह आर्थिक मदत केली आहे. तसंच, मंगल आणि त्यांच्यासारख्या कलावंतांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येकाने पुढे यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
 

Web Title: marathi producer and director mahesh tilekar give a gift paithani saree for st stand singer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.