जिंदगी का सफर,अब तेरे साथ में...! पाहिला नसेल तर नक्की पाहा कार्तिकी गायकवाडचा वेडिंग व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 10:19 AM2020-12-22T10:19:51+5:302020-12-22T10:22:53+5:30

या व्हिडीओत असे काय खास आहे तर, कार्तिकीच्या हळदीपासून ते अगदी लग्नापर्यंतचे सगळे विधी...

Zindagi ka safar, ab tere saath mein ...! kartiki gaikwad wedding video goes viral | जिंदगी का सफर,अब तेरे साथ में...! पाहिला नसेल तर नक्की पाहा कार्तिकी गायकवाडचा वेडिंग व्हिडीओ

जिंदगी का सफर,अब तेरे साथ में...! पाहिला नसेल तर नक्की पाहा कार्तिकी गायकवाडचा वेडिंग व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या गायिकेच्या जोरावर कार्तिकीने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाड नुकतीच लग्नबंधनात अडकली. कार्तिकीच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झालेत, तसेच तिच्या या शाही लग्नाचे फोटोही व्हायरल झालेत. आता या लग्नाचा सुंदर म्युझिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहिला नसेल तर तुम्ही पाहायलाच हवा.
या व्हिडीओत असे काय खास आहे तर, कार्तिकीच्या हळदीपासून ते अगदी लग्नापर्यंतचे सगळे विधी या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. या म्युझिक व्हिडीओत ‘जिंदगी का सफर.. अब तेरे साथ में...’ हे गाणे बॅकग्राऊंडला ऐकू येते. हे गाणे कोणी गायलेय माहितेयं? तर स्वत: कार्तिकीने. तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाडने तिचा गाण्यात उत्तम साथ दिली आहे. या गाण्याचा गीतकार आणि संगीतकारही कौस्तुभ गायकवाडच आहे.  या म्युझिक व्हिडीओला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत 74 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 
कार्तिकीचे चाहते महाराष्ट्रभर आहे. अशात तिचा लग्नसोहळा पाहण्याची एक संधी या व्हिडीओतून मिळणार आहे. तेव्हा देर कसली? पाहा तर...

सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाड हिचा जुलै महिन्यात साखरपुडा पार पडला होता.  या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता कार्तिकच्या लग्नातील फोटो आणि हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

कार्तिकीने रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली. रोनितचे कुटुंब हे कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील आहे.  कार्तिका पती रोनित मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे.

आपल्या गायिकेच्या जोरावर कार्तिकीने संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  घागर घेऊन,  नवरी नटली  यांसारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणारी कार्तिकी अनेकांच्या लक्षात आहे. ‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ स्पर्धेची कार्तिकी विजेती ठरली होती. अभंग, गवळणी गाताना तिचा आवाज अधिकच खुलायचा. गजर किर्तनानाचा या कार्यक्रमामध्ये ती निवेदिका म्हणूनही समोर आली आहे.

मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाडचे झाले शुभ मंगल सावधान, आर्या आंबेकरने शेअर केले लग्नातील सुंदर फोटो

असा थाटामाटात पार पडला ‘लिटिल चॅम्प्स’ कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा, पाहा फोटो

Web Title: Zindagi ka safar, ab tere saath mein ...! kartiki gaikwad wedding video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.