असा थाटामाटात पार पडला ‘लिटिल चॅम्प्स’ कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:21 AM2020-07-28T11:21:05+5:302020-07-28T11:28:08+5:30

कार्तिकी लवकरच अडकणार विवाहबंधनात

सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये चमकलेली कार्तिकी गायकवाड हिचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला.

26 जुलै रोजी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.

या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कार्तिकीने स्वत: साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंवर कमेंट करत अनेकांनी कार्तिकीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी कार्तिकीने लाल रंगाचा गाऊन घातला होता. यावेळी तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते.

वडिलांच्या मित्रपरिवारातीलच पिसे कुटुंबातील रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीची लग्नगाठ बांधली जाणार आहे.

यावेळी कार्तिकी व रोनितच्या कुटुंबीयांनी दोघांना आशीर्वाद दिलेत.

मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रोनित पिसे याचा स्वत:चा व्यवसायही आहे.

काही दिवसांपूर्वी कार्तिकीचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला होता. याचे फोटोही व्हायरल झाले होते.

‘हे सगळं अचानक ठरले. आमचं अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. संगीताचा वारसा मी पुढेही जपणार आहे. रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा दिल्या आहेत,’अशी प्रतिक्रिया कार्तिकीने लग्न ठरल्यावर दिली होती.