‘एक शून्य तीन’ लवकरच रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 18:35 IST2016-11-07T18:35:55+5:302016-11-07T18:35:55+5:30

अभिनेता सुदीप मोडक याने नेहमीच आपल्या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जुळून येती रेशीमगाठी, एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा ...

A 'zero three' will soon be playing in theater | ‘एक शून्य तीन’ लवकरच रंगभूमीवर

‘एक शून्य तीन’ लवकरच रंगभूमीवर

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेता सुदीप मोडक याने नेहमीच आपल्या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जुळून येती रेशीमगाठी, एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा अनेक मालिकांमधून त्याने प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. प्रेक्षकांचा हाच लाडका कलाकार आता, दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यास सज्ज झाला आहे. त्याचे लवकरच ‘एक शून्य तीन’ हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकामध्ये नरेन चव्हाण, अभिजित साटम, स्वानंदी टिकेकर प्रेक्षकांना पाहावयास मिळतील. या नाटकाची निर्मिती ऋजुता चव्हाण यांनी केली आहे. लिखाणाची जबाबदारी नीरज शिरवईकर यांनी पार पाडली आहे. प्रेक्षकांना  डिसेंबरपर्यंत या नाटकाची वाट पाहावी लागणार आहे. नुकतेच या नाटकाचे अपडेट सुदीप मोडक याने सोशल मीडियावर केले. त्यामुळे हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. असो, पण अभिनेता सुदीप मोडकचे दिग्दर्शनात पदार्पण होणार असल्याने त्याचे चाहतेदेखील आनंदित झाले आहे. कारण सुदीपच्या या नवीन इनिंगसाठी सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच त्याच्या या आगामी नाटकाला देखील प्रेक्षकांनी भरभरून लाइक्स दिले आहेत.

Web Title: A 'zero three' will soon be playing in theater