कोट्यवधीचे मालक असूनही नाना पाटेकर जगतात असे जीवन, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:00 AM2021-07-16T06:00:00+5:302021-07-16T06:00:00+5:30

नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात.

You will be surprised to have a look at Nana Patekar's simple lifestyle beside been Crorepati, Check Here | कोट्यवधीचे मालक असूनही नाना पाटेकर जगतात असे जीवन, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

कोट्यवधीचे मालक असूनही नाना पाटेकर जगतात असे जीवन, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !

googlenewsNext

गेल्या चार दशकांपासून नाना पाटेकर चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. मराठीच नव्हे बॉलिवूडमध्येही नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.नाना पाटेकर आवड म्हणून नाही तर परिस्थितीमुळे अभिनय क्षेत्रात आले. याच कारणामुळे ते आज साधारण आयुष्य जगतात. सिनेमात येण्यापूर्वी नाना रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम करायचे. ते अप्लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ते एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्ट आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी ते आरोपींचे स्केच बनवण्याचे काम करायचे. शिवाय 'प्रहार' सिनेमातील भूमिकेसाठी नाना यांनी ३ वर्षे लष्काराचे प्रशिक्षणही घेतलं होतं.

एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार नाना यांच्या नावे ७२ कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. यांत फार्महाऊस, कार आणि इतर कोट्यवधीच्या संपत्तीचा समावेश आहे. असं असूनही नाना पाटेकर यांच्या राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. नाना सामान्य आयुष्य जगणे पसंत करतात. नाना पाटेकर यांचा पुण्याच्या खडकवासलामध्ये २५ एकरांमध्ये पसरलेले शानदार फार्महाऊस आहे.

शहराच्या गर्दीपासून दूर जेव्हा निवांत श्वास घ्यायचा असतो त्यावेळी नाना तिथं जातात. दिग्दर्शक संगीत सिवान यांच्या २००८ मध्ये आलेल्या 'एक : द पावर ऑफ वन' सिनेमाचं चित्रीकरणही नानाच्या याच फार्महाऊसवर झालं होतं. या ठिकाणी नाना धान्य, गहू आणि हरभऱ्याचीही शेती करतात. घराजवळ अनेक प्रकारची झाडं-झुडपंही लावली आहेत. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी-म्हशी आहेत. सात खोल्यांच्या या फार्महाऊसमध्ये एक मोठा हॉल आहे. फर्निचर आणि टेराकोटा फ्लोरने नाना यांचं हे फार्महाऊस सजलं आहे.

याशिवाय नाना यांच्याकडे ८१ लाख रुपयांची ऑडी-Q7 कार आहे. तसंच १० लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि दीड लाख रु. किंमतीची रॉयल इनफिल्ड क्लासिक-३५० आहे.प्रत्येक व्यक्तीने त्याच्या गरजेनुसारच खर्च करायला हवा अशी नाना यांची धारणा आहे. त्यामुळेच आलिशान जीवन न जगता साध्या पद्धतीनेच आयुष्य जगणे पसंत करतात.

Web Title: You will be surprised to have a look at Nana Patekar's simple lifestyle beside been Crorepati, Check Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.