Tejaswini Pandit ची इतकी किलर स्टाइल यापूर्वी नसेल पाहिली, चाहते करतायेत अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:16 IST2021-12-09T16:15:18+5:302021-12-09T16:16:12+5:30

Tejaswini Panditचा या फोटोतील ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज साऱ्यांना भावतो आहे.

You have not seen such killer pics Of Tejaswini Pandits Earlier,Fans showers with unique comments | Tejaswini Pandit ची इतकी किलर स्टाइल यापूर्वी नसेल पाहिली, चाहते करतायेत अशा कमेंट्स

Tejaswini Pandit ची इतकी किलर स्टाइल यापूर्वी नसेल पाहिली, चाहते करतायेत अशा कमेंट्स

Tejaswini Pandit  सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचे असे काही फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. तेजस्विनीने स्वतः हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तेजस्विनीचा या फोटोतील ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज साऱ्यांना भावतो आहे. हे फोटो पाहून चाहतेही कमेंट्सवर कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच #BanLipsti व्हिडीओ शेअर करत मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही.बॅन लिपस्टिक! म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून सगळेच संभ्रमात पडले होते. अखेर त्याचे उत्तर सगळ्यांना समजले. अनुराधा वेबसिरीजसाठी तिने हा प्रमोशनल व्हिडीओ बनवत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

व्हिडीओचे खरे कारण समोर आले असले तरी, आता चाहते तिच्या नवीन फोटोंवर कमेट करत उत्तरं विचारत आहेत. तुम्हीतर लिपस्टिकचे समर्थन करत नाही ना मग आता कशी लिपस्टिक लावली.लिपस्टिक बॅन केली आणि परत लावली...अशा कमेट्स सध्या तिच्या फोटोंवर उमटत आहेत. चाहत्यांसह सेलिब्रेटी मंडळीसुद्धा तिच्या या अदा पाहून कौतुक करत आहे. भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो तेजस्विनी शेअर करताच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोंवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

तेजस्विनीने पहिल्यांदाच असे फोटो शेअर केले आहेत असे नाही. यापूर्वीसुद्धा अनेकदा बोल्ड लूक शेअर करत तिने चाहत्यांची वाहवा मिळवली होती. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. पारंपरिक असो वा वेस्टर्न चाहते तिच्या प्रत्येक लूकवर फुल ऑन फिदा होत असतात. 
 

Web Title: You have not seen such killer pics Of Tejaswini Pandits Earlier,Fans showers with unique comments