रिंकू राजगुरूचा हा फोटो पाहिल्याशिवाय तुम्ही स्वतःला रोखूच शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:33 IST2019-11-08T13:31:56+5:302019-11-08T13:33:35+5:30

आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच रिंकूच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.

You cannot stop yourself until you see this photo of Rinku Rajguru. | रिंकू राजगुरूचा हा फोटो पाहिल्याशिवाय तुम्ही स्वतःला रोखूच शकत नाही.

रिंकू राजगुरूचा हा फोटो पाहिल्याशिवाय तुम्ही स्वतःला रोखूच शकत नाही.

इतर अभिनेत्रींप्रमाणे रिंकू राजगुरूही सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. दिवाळीमध्येच रिंकूने तिचा साडीमधील फोटो शेअर केला होता. त्या फोटोत तिने गुलाबी रंगाची भरजरी साडी परिधान केली होती. या साडीमध्ये तिचे सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा रिंकूने तिचा नवीन फोटो शेअर केला आहे.तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. हा फोटोही पूर्वीप्रमाणे तितकाच सुंदर असून चाहते असंख्य लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे. साडीतील तिचा हा नवीन फोटो पाहून तुम्हीही  फिदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच रिंकूच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे. रिंकूने सोशल मीडियावर हा फोटो अपलोड करताच तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


 

Also Read: आर्चीने कधीच नाही केले हे काम, लवकरच पूर्ण करायची ही इच्छा....


बालपणी अकलूजमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये रिंकूने सहभाग घेतला. यांत गाणी किंवा नृत्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता. मात्र आजवर रिंकूने कोणतंही नाटक पाहिलेलं नाही. अकलूजमध्ये कोणत्याही नाटकाच्या स्पर्धा किंवा नाटकांचं आयोजन करण्यात आलं नसल्याने ती नाटकांपासून आजवर दूरच आहे. त्यामुळेच की काय तिने नाटकात कधी सहभाग घेतला नाही किंवा नाटक पाहिलंही नाही. मात्र आता एक कलाकार म्हणून नाटक पाहण्याची रिंकूची इच्छा आहे. नाटक हा प्रकार जाणून घेण्याची तिला उत्सुकता आहे.

 

लवकरच मराठी नाटक पाहण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. रंगभूमी आणि नाटकातील अभिनयाने या कलाकाराच्या अभिनय कौशल्य आणखी समृद्ध केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनाही मराठी नाटक आणि रंगभूमीने मोहिनी घातली आहे. मराठी रंगभूमीवर काम केलेल्या कलाकारांच्या अभिनयात वेगळीच ताकद असते. त्यामुळेच आर्ची अर्थात रिंकूलाही मराठी नाटक आणि रंगभूमीची भुरळ पडलीय. तिने मराठी नाटक लवकरच पाहावं आणि एखाद्या मराठी नाटकातून रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशीच इच्छा तिच्या फॅन्सची असेल. 

Web Title: You cannot stop yourself until you see this photo of Rinku Rajguru.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.