​योगिता दांडेकर बनली ‘निर्भया’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 07:24 AM2017-09-19T07:24:20+5:302017-09-19T12:54:20+5:30

योगिता दांडेकरने ‘जरा संभालके,’ ‘ट्रॅफिक सिग्नल’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी प्रमाणे योगिताने मराठीत देखील ...

Yogita Dandekar becomes 'Nirbhaya' | ​योगिता दांडेकर बनली ‘निर्भया’

​योगिता दांडेकर बनली ‘निर्भया’

googlenewsNext
गिता दांडेकरने ‘जरा संभालके,’ ‘ट्रॅफिक सिग्नल’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी प्रमाणे योगिताने मराठीत देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘राडा रॉक्स’ ‘सुखांत’ यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. तिने अनेक नाटकांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत. तिने सगळ्याच माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आता प्रेक्षकांना तिला एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्भया असे तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वानंदी प्रोडक्शन प्रस्तुत निर्भया हा मराठी सिनेमा येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अमोल अहिरराव यांची असून दिग्दर्शन आनंद बच्छाव (साई आनंद) यांचे आहे.
सार्वजनिक ठिकाणी मुलींना, महिलांना मोठ्या प्रमाणावर लैंगिक छळवणुकीचा सामना करावा लागतो. या महत्त्वाच्या मुद्दय़ावर बेतलेल्या निर्भया या सिनेमात योगिता एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना योगिता सांगते की, कठोर वास्तवाचा अनुभव देणारा हा सिनेमा असून एका दुर्देवी घटनेनंतरचा जीवन संघर्ष, भाव-भावनांचे चढ उतार यांचे हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्या ठरावीक घटनेनंतर बदललेले तिचे आयुष्य आणि त्यानंतरचा प्रवास दाखवणे हा माझ्या अभिनयाला आव्हान देणारा भाग होता. तो मी पेलण्याचा प्रयत्न केला असून प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल असा मला विश्वास आहे.
निर्भया चित्रपटाची कथा संतोष हुदलीकर यांची असून पटकथा-संवाद डॉ. मुरलीधर भावसार यांचे आहेत. या चित्रपटाचे संकलन विनोद चौरसिया यांनी केले आहे तर या चित्रपटाचे छायांकन मनिष पटेल यांचे आहे. या चित्रपटाची गीते बाबासाहेब सौदागर, अभिजीत कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाघ यांनी लिहिली असून या चित्रपटाला देव-आशिष यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते नितीन पाटील आहेत. 

Web Title: Yogita Dandekar becomes 'Nirbhaya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.