'पार्टी' सिनेमाचे पोस्टर आले समोर,तर या कलाकारांच्या आहेत मुख्य भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 18:10 IST2018-07-09T17:59:44+5:302018-07-09T18:10:10+5:30
'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या हिट सिनेमा देणारे प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता 'पार्टी' सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत.

'पार्टी' सिनेमाचे पोस्टर आले समोर,तर या कलाकारांच्या आहेत मुख्य भूमिका
मैत्रीचा हँँगओव्हर चढवणारा सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या 'पार्टी'चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला. धम्माल 'पार्टी'चा फील येत असलेल्या, या सिनेमाच्या कलरफुल पोस्टरवर सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला हे मराठीतील प्रसिद्ध युवाकलाकार आपल्याला दिसून येतात. या सिनेमाच्या नावातच 'पार्टी' असल्यामुळे, सहाजणांच्या हटके मैत्रीवर हा सिनेमा आधारित असल्याचा अंदाज येतो.
नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख या तीकडीने मिळून 'पार्टी' सिनेमाची निर्मिती केली आहे.ओमी, चकऱ्या, सुमित, मनोज, अर्पिता आणि दिपालीची फक्कड मैत्री घेऊन येत असलेली ही 'पार्टी' खास मैत्रीच्या महिन्यात आयोजित केली असल्यामुळे, प्रेक्षकांसाठी हा सिनेमा फ्रेन्डशिप डेची सरप्राईज 'पार्टी'च ठरणार आहे, हे नक्की. आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून 'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या हिट सिनेमा देणारे प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता 'पार्टी' सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच करण्यात आला होता. मात्र त्यावेळी सिनेमातील कलाकारांची नावे गुलदस्त्यातच ठेवण्यात आली होती. मात्र आता या पोस्टरच्या माध्यमातून सिनेमातील कलाकारांचीही नावे समोर आली आहेत. हटके पद्धतीने सिनेमाचे प्रमोशन होत असल्यामुळे रसिकांमध्ये सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहेत.