विनामेकअप पाहा रिंकू कशी दिसते? पाहून तुम्हीही म्हणाल कमाल है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 11:02 IST2020-03-18T10:58:00+5:302020-03-18T11:02:57+5:30

तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो

Without makeup also rinku rajguru looks beautiful gda | विनामेकअप पाहा रिंकू कशी दिसते? पाहून तुम्हीही म्हणाल कमाल है!

विनामेकअप पाहा रिंकू कशी दिसते? पाहून तुम्हीही म्हणाल कमाल है!

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रिंकूने  इन्स्टाग्रामवर तिचा एक नो मेकअप लूकमधील फोटो शेअऱ केला आहे. रिंकूच्या नो मेकअप लूकमधील फोटोवर देखील तिच्या फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. विना मेकअप लूकमध्ये देखील रिंकू तेवढीच सुंदर दिसते.  


सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक ठसकेबाज संवाद, तिचा बुलेट अंदाज, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला.

त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. काही दिवसांपूर्वीच तिचा मेकअप सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात तिच्यासोबत चिन्मय उद्गीरगकर दिसला होता. या सिनेमासाठी रिंकूने घेतलेले मानधन हे सर्वाधिक होते अशी चर्चा ऐकाला मिळाली होती. सध्या रिंकू ही मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Web Title: Without makeup also rinku rajguru looks beautiful gda