"लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत तुझी...", इंडस्ट्रीतील पदार्पणावेळी अभिनय बेर्डेला आईने दिलेला हा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:54 IST2025-12-23T12:51:43+5:302025-12-23T12:54:37+5:30
Abhinay Berde And Priya Berde : अभिनय बेर्डेने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करताना प्रिया बेर्डेंनी दिलेल्या मोलाच्या सल्ल्याबद्दल सांगितले.

"लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत तुझी...", इंडस्ट्रीतील पदार्पणावेळी अभिनय बेर्डेला आईने दिलेला हा सल्ला
अभिनय बेर्डे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे. त्यानेदेखील आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने 'ती सध्या काय करते' या सिनेमातून इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली. पहिल्याच सिनेमातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. नुकतेच त्याने आणि प्रिया बेर्डेने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीत पदार्पण करताना प्रिया बेर्डेंनी अभिनयला दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितले.
अभिनय बेर्डे म्हणाला की, माझ्या आईने मला आयुष्यभरासाठी एवढे धडे दिलेत. मी तेच आठवत होतो. कुठला स्पेसिफिकली. आय थिंक इंडस्ट्रीत करिअर करायच्या आधी ना म्हणजे यायच्या आधी नुकताच जेव्हा 'ती सध्या काय करते'चं शूटिंग सुरू होतं. तर तिने मला एक खूप महत्त्वाचा सल्ला दिला होता आणि शिकवण दिली होती की, तुझी तुलना कुठल्याही कलाकारासोबत होण्याच्या आधी तुझी तुलना तुझ्या वडिलांसोबत होणार आहे तर तू हे लक्षात ठेव पुढे हे कामगिरी पुढे करताना तर मला वाटतं ते माझ्यासोबत राहिलं आणि त्यामुळे मला ते माहिती होतं की माझी तुलना माझ्या वडिलांसोबत होणार. जे होत होतं जे होतंय आणि पण त्यांचं दडपण मी स्वतःवरती आता येऊ देत नाही.''
वर्कफ्रंट
अभिनेता अभिनय बेर्डे सध्या त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेत आहे. २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी विशेष ठरले असून त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच तो उत्तर या सिनेमात झळकला. या चित्रपटात अभिनयने रेणुका शहाणे यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय तो वडापाव या चित्रपटात दिसला. यात एका गोड कुटुंबाची 'तिखट' लव्हस्टोरी पाहायला मिळाली. त्याचा 'दशावतार' हा चित्रपटदेखील खूप गाजला.