"मी वाईट अभिनेत्री आहे, मला कास्ट करू नका", ऋतुजा बागवे असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 17:44 IST2024-04-06T17:42:43+5:302024-04-06T17:44:08+5:30

ऋतुजा बागवे स्वतःला वाईट अभिनेत्री असं का म्हणाली? हेे आहे कारण

Why did marathi actress Rutuja Bagwe say "I am a bad actress, don't cast me"? | "मी वाईट अभिनेत्री आहे, मला कास्ट करू नका", ऋतुजा बागवे असं का म्हणाली?

"मी वाईट अभिनेत्री आहे, मला कास्ट करू नका", ऋतुजा बागवे असं का म्हणाली?

ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ऋतुजाने आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केलंय. ऋतुजाने मालिका, नाटक, वेबसिरिज, शॉर्ट फिल्मस अशा विविध माध्यमांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. ऋतुजाने नुकत्याच एका मुलाखतीत मी एक वाईट अभिनेत्री आहे मला कोणत्याही सिनेमात कास्ट करू नका, असं म्हणाली आहे. का म्हणाली ऋतुजा असं? आम्ही तुम्हाला सांगतो. 

ऋतुजा नुकतीच 'विझोट कंपनी' या यू ट्यूब चॅनलच्या पॉडकास्ट मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मुलाखतकाराने ऋतुजाला विचारलं की, मराठी निर्मात्यांना काय संदेश देशील. त्यावर ऋतुजा उत्तर देताना म्हणाली, "मी एक अत्यंत वाईट अभिनेत्री आहे. त्यामुळे मला कोणत्याही सिनेमात कास्ट करू नका." असं ऋतुजा म्हणाली. तुम्हाला वाटलं असेल की ऋतुजा असं का म्हणाली? तर या पॉडकास्ट मध्ये गमतीचा भाग म्हणून हे प्रश्न विचारले गेले होते. त्यावेळी ऋतुजाला मुद्दाम खोटं बोलायच होतं. त्यामुळे खोटं बोलताना ऋतुजाने गमतीत हे उत्तर दिलं. 

ऋतुजा बागवेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिची भूमिका असलेला 'लंडन मिसळ' हा सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमात भरत जाधव, रितिका श्रोत्री, गौरव मोरे असे कलाकार होता. सिनेमाला थिएटरमध्ये संमिश्र प्रतिक्रिया मिळाला. ऋतुजाच्या अभिनयाचं मात्र खूप कौतुक झालं. हा सिनेमा सध्या प्राईम व्हिडिओवर तुम्ही पाहू शकता. ऋतुजाने 'नांदा सौख्यभरे' या मालिकेतून आणि 'अनन्या' या नाटकातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

Web Title: Why did marathi actress Rutuja Bagwe say "I am a bad actress, don't cast me"?