या कारणामुळे आदित्य मोहितेने थेट गाठले अमेरिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 10:02 AM2018-09-06T10:02:58+5:302018-09-06T10:08:07+5:30

हॉलीवूडमध्ये कलादिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनिंगचा देखील अनुभव असणाऱ्या आदित्यला चित्रपटाच्या वेगळ्या दुनियेची सफर प्रेक्षकांना घडवायची आहे.

This is why Aditya Mohite directly reached to US | या कारणामुळे आदित्य मोहितेने थेट गाठले अमेरिका!

या कारणामुळे आदित्य मोहितेने थेट गाठले अमेरिका!

googlenewsNext

सध्या चित्रपटसृष्टीत नव्या विचारांचे, शैलीचे युवा दिग्दर्शक येतायेत. वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे आदित्य मोहिते. गेली तीन वर्षे हॉलीवूड मध्ये दिग्दर्शक व कलादिग्दर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या आदित्यची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली आहे. वास्तूविशारद असलेला आदित्य पुण्यात वास्तव्यास होता. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या आदित्यला कॅमेराच्या माध्यमातून आपल्या मनातल्या कथा अधिक प्रभावीपणे सांगता येऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनं थेट अमेरिका गाठले आणि लॉस एंजलिस येथे फिल्ममेकिंगचं रीतसर प्रशिक्षण घेतलं.

हॉलीवूडच्या आपल्या कार्यकाळात विविध  टिव्ही शोज,  नाटयकृती, जाहिरातपट, लघुपट यांची निर्मिती केली. २०१६ मध्ये ‘असेश ऑफ गोल्ड’ (Ashes Of Gold) या लघुपटाचे दिग्दर्शन त्याने केले. त्यानंतर आता दोन भावांच्या  नातेसंबधांवर आधारलेला फ्रेंच संस्कृतीचा ‘क्नेड फॉर लव्ह’ (Knead For Love) हा  लघुपट  ही रसिकांच्या  भेटीला आणला आहे. ‘क्नेड फॉर लव्ह’ या लघुपटाचा गौरव अनेक आंतराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झाला असून २०१८ च्या कान्स महोत्सवाच्या लघुपट विभागातही या चित्रपटाचे जोरदार स्वागत झाले आहे. आदित्यच्या या दोन्ही लघुपटांची खासियत म्हणजे ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या अद्ययावत स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे प्रिमीयर संपन्न झाले आहेत. चित्रपटातील रंजकता हेच यशाचे गणित असून कौटुंबिक आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर आधारित वास्तववादी घडामोडींवर देखील सुंदर चित्रपट होऊ शकतात हे आदित्यने दाखवून दिले आहे.

प्रवास हा प्रत्येकाला अनेक गोष्टी शिकवत असतो. सततच्या प्रवासामुळे मला माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या कथा त्यातील माणसं भेटली आहेत. दिग्दर्शक म्हणून तुम्ही चांगला चित्रपट देणं महत्त्वाचं. नफ्या-तोट्याचं गणित हे त्यानंतर येतं असं मानणाऱ्या आदित्यच्या मते  चांगला चित्रपट बनविणे हे दिग्दर्शकाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

हॉलीवूडमध्ये कलादिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनिंगचा देखील अनुभव असणाऱ्या आदित्यला चित्रपटाच्या वेगळ्या दुनियेची सफर प्रेक्षकांना घडवायची आहे. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून त्याने हा प्रयत्न केला असून आपल्या आगामी कलाकृतीमधूनही हे  वेगळेपण जपण्याचा त्याचा मानस आहे. हॉलीवूडमध्ये आपल्या कलेची किमया दाखवणाऱ्या आदित्यला भविष्यात मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे. 
 

Web Title: This is why Aditya Mohite directly reached to US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.