शशांक केतकरचा आवडता लेखक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 12:38 PM2017-01-27T12:38:02+5:302017-01-27T18:08:02+5:30

 काही लोकांसाठी पुस्तके वाचणं हा सर्वात आवडता छंद असतो. ही लोकं पुस्तक वाचण्यासाठी आपल्या किती ही बिझी शेड्युलच्या माध्यमातून ...

Who is Shashank Ketkar's favorite author? | शशांक केतकरचा आवडता लेखक कोण?

शशांक केतकरचा आवडता लेखक कोण?

googlenewsNext
 
ाही लोकांसाठी पुस्तके वाचणं हा सर्वात आवडता छंद असतो. ही लोकं पुस्तक वाचण्यासाठी आपल्या किती ही बिझी शेड्युलच्या माध्यमातून वेळ काढू शकतात. पुस्तक म्हणजे त्याच्यांसाठी मार्गदर्शक असतात. त्यांच्यासाठी पुस्तक म्हणजे जान असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बापटनेदेखील एका ओढयाच्या तळयकाठी बसून पुस्तक वाचत असल्याचे फोटो सोशलमीडियावर अपलोड केला होता. त्याचबरोबर अशा ठिकाणी बसून पुस्तक वाचण्याचा मजा कुछ औरच म्हणत तिने एक पोस्टदेखील अपडेट केली होती. म्हणजेच कलाकार हे शुट, अ‍ॅक्शन, कॅमेरा अशा बिझी असलेल्या आपल्या चंदेरी दुनियेतून वेळ काढून पुस्तक वाचत असतात. असाच प्रेक्षकांचा लाडका कलाकार शशांक केतकरसाठीदेखील पुस्तक हे खूपच महत्वाचे आहे. नुकतेच त्याने दिलेल्या एका वृत्तपत्राच्या मुलाखतीतून पुस्तकांविषयी असणार्या प्रेमाचा खुलासा केला. शशांक सांगतो, मला व.पु, काळे यांची पुस्तके वाचण्याच खूप आवडतात. मी हाडाचा वाचक नसलो तरी मला व.पु. काळे यांचे पुस्तक वाचण्यास मला फार आवडतात. त्यांची लेखनशैली जास्त भावते. त्यांनी लिहीलेले मित्र हे पुस्तक माझ्या अगदी जवळचे आहे. आतापर्यत जास्त पुस्तके मी व.पु, काळे यांचीच वाचली आहे. तसेच महेश एलकुंचवार यांची पुस्तकेदेखील वाचण्यास आवडत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. शशांक केतकर याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच तो होणार सून मी हया घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजिवले आहे. या मालिकेत शशांकसोबत तेजश्री प्रधान पाहायला मिळाली. या मालिकेतील शशांकची श्रीची भूमिका फार प्रेक्षकांना भावली आहे, तसेच तो नुकताच वन वे तिकीट या चित्रपटातदेखील झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर पाहायला मिळाली होती. त्याच्या या चित्रपटानेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

Web Title: Who is Shashank Ketkar's favorite author?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.