आर्चीच्या परश्यासोबत असलेली 'ही' मिस्ट्री वुमन आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:32 IST2021-09-16T13:31:47+5:302021-09-16T13:32:14+5:30

आकाश ठोसरच्या लेटेस्ट लूकची चर्चा होत असताना त्याच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Who is this 'Mystery Woman' with Archie's Parsha? The photo is going viral | आर्चीच्या परश्यासोबत असलेली 'ही' मिस्ट्री वुमन आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

आर्चीच्या परश्यासोबत असलेली 'ही' मिस्ट्री वुमन आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

२०१६ साली रिलीज झालेल्या सैराट चित्रपटात परश्याच्या भूमिकेतून अभिनेता आकाश ठोसर घराघरात पोहचला. पहिल्याच चित्रपटातून तो एका रात्रीत लोकप्रिय झाला. या चित्रपटानंतर त्याने मराठी चित्रपट, हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले. आता त्याचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. आकाश ठोसर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. बऱ्याचदा तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आता त्याच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. त्याच्या लेटेस्ट लूकची चर्चा होत असताना त्याच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

परशा उर्फ आकाश ठोसरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर त्याचे नवीन फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोमधील त्याचा लूक चाहत्यांना खूपच भावला आहे. या फोटोशूटमधील एक फोटो त्याने नुकताच शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या मागे कोणीतरी मुलगी पहायला मिळते आहे. मात्र त्यात तिचा चेहरा दिसत नाही. ही तरूणी त्याच्या केसांमध्ये हात फिरवताना दिसत आहे.

त्याचा हा फोटो पाहून ही कोण आहे, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. त्याच्या फोटोला पसंती मिळत आहे आणि चाहते मागे कोण आहे, मागे रिंकू आहे का असे प्रश्न विचारत आहे. त्याचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. 


आकाश ठोसरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याने सैराटनंतर एफयूः फ्रेंडशिप अनलिमिडेट या चित्रपटात काम केले. हिंदी वेबसीरिज लस्ट आणि १९६२ः द वॉर इन द हिल्समध्ये त्याने काम केले.

नागराज मंजुळे दिग्दर्शित, अमिताभ बच्चन अभिनीत झुंड चित्रपटात आकाश झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरूदेखील पहायला मिळणार आहे. 

Web Title: Who is this 'Mystery Woman' with Archie's Parsha? The photo is going viral