मुन्ना पांडे कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 12:33 IST2016-12-06T12:31:01+5:302016-12-06T12:33:13+5:30
मराठी चित्रपटसृष्टीत मुन्ना पांडे ही व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहितीय का? अहो या मुन्ना पांडेने संपूर्ण चित्रपटसृष्टीला वेड ...
.jpg)
मुन्ना पांडे कोण आहे?
म ाठी चित्रपटसृष्टीत मुन्ना पांडे ही व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहितीय का? अहो या मुन्ना पांडेने संपूर्ण चित्रपटसृष्टीला वेड लावले आहे. बरं असे असले तरी मुन्ना पांडे सर्वच कलाकारांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार कि हा मुन्ना पांडे आहे तरी कोण. तर तो अभिनेता नसुन मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिदध अभिनेत्री आहे. होय, एका अभिनेत्रीचे नाव चक्क मुन्ना पांडे असे आहे. ही अभिनेत्री नवीन नसून तिने चित्रपटसृष्टीवर तिच्या अभिनयाने गारुड घातले आहे. अनेक प्रसिदध चित्रपटांमध्ये दर्जेदार अभिनय करणारी ही ्भिनेत्री दुसरी कोणी नसूस प्रेक्षकांच्या ऋदयावर कट्यार चालविणारी मृण्मयी देशपांडे आहे. होय, मृण्मयीचे मराठी चित्रपटसृष्टीतील टोपण नाव मुन्ना पांडे असल्याचे नुकतेच समोर आले आहे. काही दिवसांपुर्वीच मृण्मयीचे लग्न झाले आहे. सर्वच कलाकारांनी आपल्या लाडक्या मुन्नाला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. मृण्मयीच्या या एकदमच भन्नाट आणि हटके टोपण नावा विषयी तिच्या जवळच्या मित्राने म्हणजेच, अभिनेता सिदधार्थ चांदेकरने लोकमत सीएनएक्ससोबत या नावाचा उलगडा केला. सिदधार्थ सांगतो, मृण्मयीचे हे नाव कोणी ठेवले हे मला तरी अजुन पर्यंत कळलेले नाही. पण ज्यांनी कोणी तिचे हे नामकरण केले आहे ते फारच भारी आहे. कारण मृण्मयी देशपांडे हे लांबलचक नाव घेण्यापेक्षा आम्ही थेट तिला मुन्ना म्हणतो. ते म्हणायलाही छान वाटते आणि सोपे जाते. अनेक वर्षांपासून तिला सगळेजणच मुन्ना म्हणतात. परंतू मला आठवतेय आम्ही कॉलेजमध्ये असताना तिला हे नाव नव्हते. त्यामुळे चित्रपटसृष्टीतूनच तिला मन्नु पांडेची ही नवीन ओळख मिळाल्याचे सिदधार्थने अगदी हसत हसत सांगितले.