ओळखा पाहू कोण आहे हा मराठी अभिनेता? पहिलाच चित्रपट ठरला होता बॉक्स ऑफिसवर हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 12:08 IST2018-05-29T06:26:19+5:302018-05-29T12:08:17+5:30
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ...
.jpg)
ओळखा पाहू कोण आहे हा मराठी अभिनेता? पहिलाच चित्रपट ठरला होता बॉक्स ऑफिसवर हिट
ल ्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या चित्रपटातील अभिनयाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. तसेच या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनयने देखील हीरो बनण्याचेच स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्ण देखील केले. अभिनयचा आता अशी ही आशिकी हा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या चित्रपटाची निर्मिती सचिन पिळगांवकर करत आहे. सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता सचिन आणि लक्ष्मीकांत यांच्या मुलाची जोडी जमली असून ही या चित्रपटात हेमल इंगळे ही नवी अभिनेत्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशी ही आशिकी ही एक लव्ह स्टोरी असून या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत असणार असल्याचे कळतेय.
अभिनयला अभिनयाचा वारसा हा त्याचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे आणि आई प्रिया बेर्डे यांच्याकडून मिळाला. या दोघांनीही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयनेच त्याच्या लहानपणीचा हा फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला असून या फोटोत तो खूपच गोड दिसत आहे. हा फोटो पाहून आपल्या लगेचच लक्षात येत आहे की, अभिनय अनेकवेळा त्याच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सोबत जात असे. अशाच एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हा फोटो काढला असल्याचे आपल्याला हा फोटो पाहूनच कळत आहे.
अभिनय या फोटोत खूपच वेगळा दिसत असल्याने या फोटोत खरंच अभिनय आहे का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे आणि त्यामुळे अनेकांना हा खरंच तुझा फोटो आहे का असा प्रश्न देखील त्याला इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर विचारलेला आहे. तसेच या फोटोत अभिनय खूपच छान दिसत असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
![abhinay berde]()
Also Read : अशी ही आशिकी या चित्रपटात अभिनय बेर्डेसोबत झळकणार ही नायिका