पाठमोरा बंदूक्या आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 09:42 AM2017-08-22T09:42:34+5:302017-08-22T15:12:34+5:30

बंदूक्या' सिनेमाचे भन्नाट पोस्टर, खळबळ माजवणारे मोशन पोस्टर आणि सोशल नेटवर्किंग साईट वरून धुमाकूळ घालण्याऱ्या ट्रेलर मुळे या चित्रपटाबाबत ...

Who is the backpack shotgun? | पाठमोरा बंदूक्या आहे तरी कोण?

पाठमोरा बंदूक्या आहे तरी कोण?

googlenewsNext
दूक्या' सिनेमाचे भन्नाट पोस्टर, खळबळ माजवणारे मोशन पोस्टर आणि सोशल नेटवर्किंग साईट वरून धुमाकूळ घालण्याऱ्या ट्रेलर मुळे या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. बंदूक्या म्हणजे काय, त्याचा नेमका अर्थ काय, कोण आहे तो आणि "आपलीच माेरी अन् मुतायची चाेरी" असे म्हणत असा पाठमोरा उभा रहाण्याचे कारण या सर्व गोष्टींचा उलगडा सिनेमात बंदूक्याची भूमिका करणाऱ्या नामदेव मुरकुटे याने स्वतः केला आहे. 
राहुल मनोहर चौधरी दिग्दर्शित या सिनेमात नामदेव नेमका हिरो की व्हिलन हे ठरवणं तसं कठीणच आहे. यावर नामदेवने चांगलीच पोल खोल केली आहे. 'बंदूक्या' हे एका प्रवृत्तीचं नाव आहे. जी एका विशिष्ठ प्रथेच्या नावावर अजूनही जिवंत आहेत. बंदूक्याला पाहताना तुम्हाला कधी राग येईल तर कधी त्याचं बोलणं पटेलही. या सिनेमाची पटकथा राहुल सर आणि मी लिहिली आहे तर संवाद माझे आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षक पहिल्यांदाच "जुंदरी झटका" अनुभवणार आहेत. मी स्वतः जुन्नर भागातील राजूर या गावचा असल्याने त्या प्रकारची बोली भाषा या सिनेमात वापरण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच अभिनेता लेखक म्हणून प्रेक्षकांसमोर येताना थोडीशी धाकधूक होती पण मी निळू भाऊंच्या घराण्याचा असल्याने माझ्याकडून हा बंदूक्या साकारला गेला. नामदेव तसा २० ते २२ वर्ष गावीच असल्याने तिथल्या जुंदरी भाषेचं बाळकडू कोळून प्याला आहे. ज्याची दखल थेट राज्य शासनाच्या ५४ व्या चित्रपट पुरस्कारात घेतली गेली.
 'बंदूक्या' सिनेमासाठी नामदेवला 'बेस्ट डायलॉग' हा पुरस्कार मिळाला. हा निखळ मनाेरंजनाचा जुंदरी झटका प्रेक्षकांनी येत्या १ सप्टेबर २०१७ रोजी सिनेमागृहात जाऊन एकदा तरी नक्कीच चाखायला हवा. नामदेवच्या १० ते १५ वर्षांच्या स्ट्रगल नंतर बंदुक्या त्याच्यासाठी ओळख मिळवून देणारा ठरेल. गावीच बी.कॉम पूर्ण करून मुंबईत आलेल्या नामदेवने मुबई विद्यापीठातून मास्टर्स इन थिएटर आर्टस् पूर्ण केले. प्रायोगिक रंगभूमीसाठी बरंच काम केलं. त्यानंतर सिनेमाचं लिखाण करताना बंदूक्याच्या निमित्ताने मोठी संधी मिळाली. 
नामदेव या सिनेमात प्रमुख भूमिकेत असल्याने त्याला तशी तयारी देखील करावी लागली. तो म्हणतो, सतत लिखाणाच्या कामात असल्याने माझं शरीर थोडंसं स्थूल झालं होतं पण सिनेमातील बंदूक्या हा राकट, धिप्पाड शरीर यष्टीचा असल्याने चित्रीकरणा आधी सहा महिने बॉडी टोण्ड करण्यासाठी जिम जॉईन  केली. 
लहानपणापासून निळू फुले यांचा अभिनयाचे संस्कार झाल्याने मी त्याच्याच घराण्याचा एक भाग असल्याचं समजून अभिनयाचा वारसा पुढे चालवतोय.

Web Title: Who is the backpack shotgun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.