सलीलने कुठे केली फेरारीची सवारी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 16:20 IST2016-11-11T13:22:36+5:302016-11-11T16:20:31+5:30

सलील कुलकर्णींची गाणी सर्वांनाच आवडतात. मराठी चित्रपटसृष्टीताल आघाडीचे संगीतकार म्हणुन आज सलीलची ओळख आहे. अनेक मराठी गीतांना त्यांनी संगीत ...

Where did Selerite Ferrari Ride? | सलीलने कुठे केली फेरारीची सवारी ?

सलीलने कुठे केली फेरारीची सवारी ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">सलील कुलकर्णींची गाणी सर्वांनाच आवडतात. मराठी चित्रपटसृष्टीताल आघाडीचे संगीतकार म्हणुन आज सलीलची ओळख आहे. अनेक मराठी गीतांना त्यांनी संगीत दिल्याने त्यांची कारकीर्द नेहमीच उल्लेखनीय ठरलीय. सलीलने रिऑलिटी शोचे परीक्षणदेखील केले आहे. एवढेच नाही तर चिमुकल्या गायकांचा आवडताही तो झाला आहे. पण तुमच्या या लाडक्या गायकाला ड्रायव्हींग करायला फार आवडते हे तुम्हाला माहित आहे का? सलीलला गायना व्यतिरिक्त गाडी चालवण्याची देखील आवड असल्याचे आता समोर आले आहे. अहो हे आम्ही सांगत नाही तर हे स्वत: सलीलने सांगितले आहे. सोशल साईट्सवर सलीलने नुकताच या गोष्टीचा उलगडा केला आहे. सलील सांगतोय आय लव्ह ड्रायव्हींग. त्याचे झाले असे की. सलील दुबईमध्ये त्याच्या फॅमिली फ्रेन्ड्सकडे गेला होता. त्यावेळी त्यांनी त्याला विचारले, आमच्या कारची एक चक्कर मारता का? आता मित्रांना तर नक्कीच माहित असणार की अपल्या या दोस्ताला गाडी चालवायला जाम आवडते. म्हणूनच कि काय त्यांनी सलीला ही ऑफर दिली. बरं एवढच नाही तर त्याची आवडती कार फेरारी असल्याचे देखील समजत आहे. खरंच आहे म्हणा, स्वप्न बघायला काय पैसे पडतात का. सलीलने देखील असेच सुंदर स्वप्न पाहिले आणि ते सोशल साईट्सवर शेअर देखील केले. अ‍ॅस्टन मार्टिन, पोर्श आणि फेरारी या त्यांच्या ड्रीम कार्स असल्याचे त्यांनी सोशल साईट्सच्या पोस्टवर सांगितले आहे. लवकरच सलीलकडे या गाड्या याव्यात असेच त्याच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असणार. 

 

Web Title: Where did Selerite Ferrari Ride?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.