अकेले अकेले कहाँ जा रहे हो ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 18:24 IST2016-10-20T16:36:26+5:302016-10-20T18:24:58+5:30

सैराट या चित्रपटातून परश्या म्हणजेच आकाश ठोसर याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. सैराट चित्रपटाव्दारे आकाश हा एका रात्रीत ...

Where are you going alone? | अकेले अकेले कहाँ जा रहे हो ?

अकेले अकेले कहाँ जा रहे हो ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">सैराट या चित्रपटातून परश्या म्हणजेच आकाश ठोसर याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. सैराट चित्रपटाव्दारे आकाश हा एका रात्रीत स्टार झाला.  सैराटनंतर त्याला एकापाठोपाठ एक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. एवढेच नाही तर बॉलिवूडदेखील आकाशच्या प्रेमात पडले असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर त्याचे फॅन फॉलोविंग देखील दिवसेदिवस वाढताना दिसते आहे. आता हेच पाहा ना, आकाशने नुकतेच सोशल मीडियावर बाईक राइडिंग करतानाचा फोटो अपलोड केले आहे. या फोटोतून आकाश हा एकटा कुठे निघाला आहे हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. या फोटोत आकाशच्या आजूबाजूला चाहत्यांची गर्दीदेखील पाहायला मिळत आहे. तर सिंग्नलला उभा असलेल्या आकाशचे फोटो काढण्यासाठी त्याच्या चाहत्यांचे मोबाईलचे कॅमेरे पुढे सरसावले आहे. त्याच्या या फोटोला सोशल मीडियावर प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. तर काहीजणांनी अकेले अकेले कहाँ जा रहे हो, हमें भी साथ ले चलना असे म्हणत आकाशवर असणारे प्रेम व्यक्त केले आहे. आकाशचे हे बाईक रायडिंगचे फोटो हे शूटिंग दरम्यानचे आहे का? किंवा खरेच त्याने मुंबईच्या रस्त्यांवर बाईक रायडिंगचा आनंद घेतला आहे हे अजून काही कळू शकलेले नाही. कारण आकाश सध्या महेश मांजरेकर यांच्या 'एफ यू' या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. तसेच तो मध्यंतरी एका बॉलिवूड पार्टीमध्ये देखील दिसला  होता. त्यामुळे आकाशची गाडी सध्या सुसाट निघाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. असा हा  तरूणांईची धडकन बनलेला हिरो जर एकटा बाईकवरून निघाला असेल. तर तो नक्की कुठे चालला असणार यांची चुणचुण तर प्रेक्षकांना लागणे सहाजिकच आहे. 




 

Web Title: Where are you going alone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.