r /> पावसाळा तर सगळ््यांनाच हवाहवासा वाटतो. सर्वत्र पसरलेला मातीचा सुगंध... अंगावर शहारा आणणारा गार वारा अन चिंब भिजवुन ओले करणारे पाण्याचे थेंब अंगावर पडले की सर्वकाही विसरायला होते. अशा या पावसाच्या रोमँटिक वातावरणात सगळ््यांच्या आठवणी या वेगवेगळ््या असतात. पाऊस पडायला लागल्यावर काहीजणांना मस्त कुठेतरी फिरायला जावेसे वाटते तर काही जणांना चहाचे फुरके मारीत गरमा गरम कांदा भजीचा आस्वाद घ्यायची इच्छा होते. परंतू आपली सोज्वळ अभिनेत्री स्पृहा जोशी हीची गंमत जरा वेगळीच आहे. स्पृहाला पाऊस पडु लागल्यावर म्हणे कविता सुचतात. असे आम्ही सांगत नाही तर स्वत: स्पृहाच हे म्हणत आहे. सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण असुन क्लायमेट अगदी झक्कास झाले आहे. अन अशा या भारी वातावरणात स्पृहाला मस्त कविता सुचत आहेत. रिमझिमत्या सरि आठवणी होऊन वाहायला लागतात.... जरा कुठे त्याची चाहुल काय लागते, लगेच कविता सुचायला लागतात.... अशा सुंदर चारोळी स्पृहाने केल्या असुन तीला कविता कशा सुचतात याचे अप्रतिम वर्णन तिने या चार शब्दांमध्ये केले आहे. खरच आहे म्हणा, प्रत्येकाची गोष्ट निराळी असते. या पावसाच्या ऋतूत काहींना कविता सुचतात तर काहीजण रोमँटिक गाण्यांमध्ये पार बुडुन जातात.
{{{{twitter_post_id####}}}}
Web Title: When poetry suggests to the Sprulla
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.