तेजस्विनी पंडित कोणत्या गोष्टीमुळे झाली आहे अस्वस्थ, वेगळ्याच अंदाजात व्यक्त केली मनातील तगमग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 10:38 IST2017-09-25T05:08:05+5:302017-09-25T10:38:05+5:30

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमातील भूमिका असो किंवा ...

What is the reason that Tejaswini Pundit has been disturbed, expressed in a different story! | तेजस्विनी पंडित कोणत्या गोष्टीमुळे झाली आहे अस्वस्थ, वेगळ्याच अंदाजात व्यक्त केली मनातील तगमग !

तेजस्विनी पंडित कोणत्या गोष्टीमुळे झाली आहे अस्वस्थ, वेगळ्याच अंदाजात व्यक्त केली मनातील तगमग !

िनेत्री तेजस्विनी पंडित हिनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमातील भूमिका असो किंवा मग '100 डेज' मालिकेतील ग्लॅमरस भूमिका असो प्रत्येक भूमिकेला तेजस्विनीनं न्याय दिला. संवेदनशील अभिनय, ग्लॅमरस अदा आणि सौंदर्य यामुळे तेजस्विनी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्री असलेल्या तेजस्विनीने स्वतःचा फॅशन ब्रँडही लॉन्च केला. त्यामुळे अभिनेत्री ते उद्योजिका असा प्रवास तिने यशस्वीरित्या पार केला आहे. अभिनेत्री असलेली तेजस्विनी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. उत्तम अभिनेत्री असलेली तेजस्विनी माणूस म्हणूनही संवेदनशील आहे. त्यामुळे समाजात घडणा-या विविध घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस्विनी आपल्या भावना व्यक्त करत असते. सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीचे काही फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोत तेजस्विनीचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तिचे हे दोन्ही फोटो बरेच बोलके आहेत. तेजस्विनीच्या डोळ्यात वेगळ्याच प्रकारचा राग आणि संताप पाहायला मिळत आहे. याशिवाय फोटोमधील लूकही तितकाच वेगळा आहे.एका फोटोत मोकळे सोडलेले केस, गळ्यात गुंडाळलेला स्कार्फ, मोठी टिकली, भुवयांच्या वरच्या बाजूला नक्षी आणि नाकात भली मोठी रिंग रुपातील नथ असा तेजस्विनीचा अवतार पाहायला मिळत आहे. तर तेजस्विनीचा दुसरा फोटो आणखी वेगळा आहे. कारण या फोटोत तेजस्विनीची निम्मी छबी पाहायला मिळत आहे. (Also Read: तेजस्विनी पंडीतचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला ?)



या फोटोतही तिचा राग पाहायला मिळत आहे. या फोटोंसह तेजस्विनीने एक पोस्टही टाकली आहे. “समाजात पॉर्नस्टारला सेलिब्रिटीचा दर्जा मिळतो, मात्र बलात्कार पीडितेला हा समाज माणूस म्हणून स्वीकारत नाही. आजही मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नावर अधिक खर्च केला जातो” अशी पोस्ट तिने या फोटोसह टाकली आहे. हे फोटो आणि पोस्ट यामुळे संवदेनशील अभिनेत्री असलेली तेजस्विनी प्रत्यक्ष जीवनात माणूस म्हणून तितकीच संवेदनशील असल्याचे पाहायला मिळत आहे. समाजात महिला अत्याचाराच्या विशेषतः बलात्काराच्या दिवसागणिक वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत आहेत. यांत अल्पवयीन मुली आणि तरुणींवरील बलात्काराच्या घटना तर सुन्न करुन टाकतात. कायदा कितीही कठोर झाला तरी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे अन्यथा कित्येक निर्भयांचं आयुष्य उद्धवस्त होईल अशीच भीती तेजस्विनीच्या या फोटो आणि पोस्टमधून व्यक्त होत आहे.   

Web Title: What is the reason that Tejaswini Pundit has been disturbed, expressed in a different story!