या खेळाडूंसोबत काय करतोय भुषण प्रधान ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 10:28 IST2017-05-23T11:18:05+5:302017-05-24T10:28:11+5:30
भुषण प्रधानने कुंकू, पिंजरा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. संस्कृती बालगुडेसोबतची त्याची पिंजरा ही मालिका प्रचंड गाजली होती. भुषण ...

या खेळाडूंसोबत काय करतोय भुषण प्रधान ?
भ षण प्रधानने कुंकू, पिंजरा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. संस्कृती बालगुडेसोबतची त्याची पिंजरा ही मालिका प्रचंड गाजली होती. भुषण मालिकांसोबत अनेक चित्रपटांमध्येदेखील झळकला आहे. त्याने टाइमपास, कॉफी आणि बरेच काही, टाइम बरा वाईट यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भुषणचा काही महिन्यांपूर्वी शिव्या हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तो लवकरच एका नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भुषणचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या फॅन्सना सांगितले आहे.
भुषण त्याच्या नव्या चित्रपटातील भूमिकेची सध्या जोरदार तयारी करत आहे. या चित्रपटात भुषण एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. भुषण गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटासाठी तो काही खेळाडूंसोबत चित्रीकरण करत आहे.
भुषणने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण बालेवाडी स्टेडिअममध्ये केले आहे हे त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून कळत आहे. त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत त्याच्यासोबत आणखी तीन मुले आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनदेखील लिहिली आहे. त्याने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, माझ्या चित्रपटाचे नुकतेच पॅकअप झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरचा अॅथलेट आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांसारख्या अतिशय चांगल्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तुमच्यासाठी मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. हा माझा नवीन चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत भुषण सांगतो, ''हा चित्रपट एका खेळाशी निगडीत आहे. चित्रपट खेळाशी निगडीत असल्याने अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला यात पाहाता येणार आहेत. याचित्रपटात माझी भूमिका फारच वेगळी आहे. या चित्रपटात माझ्यासोबत हंसराज जगताप आणि विवेक चाबुकस्वार हे दोन बालकलाकार ही आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले आहे.''