Put your sexy dress आणि बरंच काही म्हणाली 'ही' मराठी अभिनेत्री, पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 17:36 IST2020-07-15T17:31:18+5:302020-07-15T17:36:03+5:30
'का रे दुरावा' ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेत आपल्याला अर्चना निपाणकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

Put your sexy dress आणि बरंच काही म्हणाली 'ही' मराठी अभिनेत्री, पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष
नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो ती अभिनेत्री म्हणजे अर्चना निपाणकर. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच तिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळाला होता. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. याआधीही तिने आपल्या मॉडर्न आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.हा फोटो शेअर करत तिने तिच्या मनात सुरू असलेली घामलेच दूर केली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फोटो पाहिल्यानंतर कॅप्शनही सा-यांचे लक्ष वेधून घेते.
'का रे दुरावा' ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेत आपल्याला अर्चना निपाणकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अर्चनाने अनेक मालिकांमध्ये काम करण्यासोबतच ती नुकतीच पानिपत या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने राघोबादादा पेशवे यांच्या पत्नीची म्हणजेच आनंदीबाईची भूमिका साकारली होती.