हिंदी सिनेमात काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:00 PM2023-10-14T13:00:32+5:302023-10-14T13:01:15+5:30

आम्ही मध्यंतरी सिंबा सिनेमासाठी गेलो होतो. त्यात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, अरुण नलावडे हे मराठी कलाकारही होते.

Vijay Patkar reveals how do Marathi actors interact with each other while working in Hindi cinema | हिंदी सिनेमात काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले...

हिंदी सिनेमात काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले...

मराठीतील अनेक कलाकार हिंदी सिनेमात भूमिका करतात. लक्ष्मीकांत बेर्डें, अशोक सराफ यांच्यापासून ते आता सिद्धार्थ जाधवपर्यंत अनेकांनी लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये तर हमखास मराठी कलाकारांची मांदियाळी असते. नुकतंच अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) यांनी हिंदी सिनेमांच्या सेटवर मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात याचा खुलासा केला. 

'लोकमत फिल्मी'च्या आपली यारी या कार्यक्रमात मराठी कलाकार विजय पाटकर, जयवंत वाडकर आणि तुषार दळवी यांनी धमाल केली. यावेळी विजय पाटकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच मराठी कलाकार जेव्हा हिंदीत काम करतात तेव्हा एकमेकांशी कसं वागतात याचा खुलासा केला. ते म्हणाले, 'सिंघम, सिंबा सारख्या हिंदी सिनेमात आम्ही काही मराठी कलाकार एकत्र होतो. सिंघममध्ये अशोक मामा होते. आमचा एकत्र सीन नव्हता. ते खरं तर माझेही सिनिअर पण तेव्हा शूटच्या वेळी त्यांनी मला पाट्या कुठंय..कुठंय म्हणत फोन केला. म्हटलं आहे आहे आलो आलो..संध्याकाळी आम्ही भेटलो आणि गप्पा मारत बसलो. हे मराठी कलाकारांचं बाँडिंग आहे.'

ते पुढे म्हणाले,'आम्ही मध्यंतरी सिंबा सिनेमासाठी गेलो होतो. त्यात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, अरुण नलावडे हे मराठी कलाकारही होते. मला सगळे शोधत आले. हे मराठी कलाकार. बाकी इतर वेळी मी जातो तेव्हा एकदा दरवाजा आतून बंद केला की दुसऱ्या दिवशी कॉल टाईमलाच उघडतो. पण इथे आम्ही मराठी कलाकार सगळे एकत्र होतो. जे आम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेंनी शिकवलं. सगळे एकत्र बसा तेव्हा बाँडिंग होतं. तिथे तुम्ही मित्र होता.'

विजय पाटकर विनोदी कलाकार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक मराठी, हिंदी सिनेमात विनोदी भूमिका केल्या आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ते आता सिद्धार्थ जाधव पर्यंत अनेक कलाकारांसोबत विजय पाटकर गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत.

Web Title: Vijay Patkar reveals how do Marathi actors interact with each other while working in Hindi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.