VIDEO: मानसी नाईकच्या आईने घेतला लय भारी उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 11:44 IST2021-01-18T11:44:23+5:302021-01-18T11:44:55+5:30

अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. q

VIDEO: Mansi Naik's mother took the rhythm heavily, the video is going viral | VIDEO: मानसी नाईकच्या आईने घेतला लय भारी उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

VIDEO: मानसी नाईकच्या आईने घेतला लय भारी उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर फेम अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. मानसीच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या गृहमुख पूजेचे फोटो समोर आले होते. त्यानंतर आता तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आईने घेतलेला उखाणा शेअर केला आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते आहे.

बायॅफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडणार आहे. येत्या १९ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होणार आहे. मानसी तशी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे. नुकताच तिने तिची आई उखाणा घेत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, आकाशाचा केला कागद, समुदाची केली शाई, तरीही आईचा महिमा, लिहीता येणार नाही..आईचा उखाणा. लव्ह यू आई.


या व्हिडीओत मानसीच्या आईला उखाणा घेण्याचा आग्रह केला असता त्यांनी म्हटले की, माझी लेक आहे पडद्यावर चमचमणारी चांदणी, लग्नघटीका समीप आली, गाऊ आनंदाची गाणी, गृहमुखाचे दिवशी सांगते राजन माझे राजा आणि मी त्यांचीच राणी.


मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

मानसी नाईकला मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या राय संबोधले जाते. तिचा लूक देखील काहीसा ऐश्वर्या सारखा आहे. त्यामुळेच कदाचित मानसीने तिच्या लग्नात ऐश्वर्याचाच एक लूक फॉलो करायचे ठरवले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या मुलाखतीत मानसीने याबाबत सांगितले आहे. मानसी नाईक ही जोधा अकबरमधील ऐश्वर्यासारखीच तिच्या लग्नात तयार होणार आहे. ती म्हणाली की, 'ऐश्वर्या ही माझी आवडती अभिनेत्री आहे. ती जशी जोधा अकबरमध्ये तयार झाली होती तसे तयार होणे हे माझे स्वप्न आहे.


१९ जानेवारीला मानसीचे प्रदीपसोबत विवाह पार पडणार आहे. त्यानंतर ते दोघेही प्रदीपच्या मूळ गावी फरिदाबादला रवाना होणार आहेत. मुंबईत या दोघांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने होणार असून त्यानंतर फरिदाबादला प्रदिपकडील काही विधी पार पडणार आहेत.

Web Title: VIDEO: Mansi Naik's mother took the rhythm heavily, the video is going viral