VIDEO: मानसी नाईकच्या दिवसाची सुरूवात होते अशी, शेअर केला नवरा प्रदीपसोबतचा रोमँटिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:31 PM2021-02-02T12:31:54+5:302021-02-02T12:32:38+5:30

मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबतचा रोमँटिक व्हिडीओ नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

VIDEO: Mansi Naik's day begins, shared romantic video with husband Pradip | VIDEO: मानसी नाईकच्या दिवसाची सुरूवात होते अशी, शेअर केला नवरा प्रदीपसोबतचा रोमँटिक व्हिडीओ

VIDEO: मानसी नाईकच्या दिवसाची सुरूवात होते अशी, शेअर केला नवरा प्रदीपसोबतचा रोमँटिक व्हिडीओ

googlenewsNext

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती. नुकतेच ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान आता मानसीने प्रदीपसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच तिने काही रोमँटिक अंदाजातील फोटोदेखील शेअर केले आहेत. तिच्या या व्हिडीओ आणि फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

मानसी नाईकने प्रदीप खरेरासोबतचा रोमँटिक व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, आता सकाळ अशी होत असल्याचे म्हटले आहे. मानसीच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

तसेच मानसीने प्रदीप खरेरासोबतचे रोमँटिक फोटो देखील शेअर केले आहेत. यात दोघांनी एकाच पॅटर्नचे आऊटफिट घातले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.


मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.


एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Web Title: VIDEO: Mansi Naik's day begins, shared romantic video with husband Pradip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.