Video: अमृता खानविलकर व तिच्या आईचा मजेशीर व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 11:55 IST2020-05-05T11:54:24+5:302020-05-05T11:55:25+5:30

अमृता खानविलकर हिने आईसोबतचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला खूप पसंती मिळते आहे.

video: Funny video of Amrita Khanwilkar and her mother | Video: अमृता खानविलकर व तिच्या आईचा मजेशीर व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Video: अमृता खानविलकर व तिच्या आईचा मजेशीर व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

 मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राझी', 'सत्यमेव जयते' आणि मलंग अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. सध्या लॉकडाउनमुळे अमृता घरात कैद असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने तिच्या आईसोबतचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आईसोबतचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, जेव्हा मी दोन वेळचे जेवण बनवले तेव्हा आई म्हणाली आता उद्या पासून तूच सगळं बनव. आता उद्यापासून तुच बनव सगळं. आईसोबत नो पंगा. असं कॅप्शन अमृताने दिले आहे.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: video: Funny video of Amrita Khanwilkar and her mother