"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."

By देवेंद्र जाधव | Updated: June 16, 2025 10:54 IST2025-06-16T10:53:48+5:302025-06-16T10:54:16+5:30

७७ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर यांनी डोळ्यात पाणी आणणारी करुण कहाणी सर्वांसमोर मांडली आहे. मला पैसे नको, काम द्या, असंही ते म्हणाली

veteran Marathi actor manmohan mahimkar talk about his bad life situtaion | "मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."

"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."

मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्यावर वाईट वेळ आली आहे. या अभिनेत्याने त्याची भावुक अवस्था सर्वांसोबत शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणते मनमोहन माहिमकर. ज्येष्ठ अभिनेते मनमोहन यांनी अनेक सिनेमांमध्ये काम करुन मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परंतु सध्या मनमोहन यांची अवस्था खूप बिकट आहे. मनमोहन यांनी लोकमत फिल्मीच्या द अनटोल्ड स्टोरी कार्यक्रमात बोलताना याविषयी खुलासा केला. काय म्हणाले?

मनमोहन माहिमकर यांची दुःखद कहाणी

लोकमत फिल्मीच्या द अनटोल्ड स्टोरी कार्यक्रमात बोलताना मनमोहन म्हणाले की, "माझी परिस्थिती फार बिकट आहे. वय झाल्यामुळे मला काही कामं मिळत नाहीत. सरकार मला महिन्याला फक्त ५ हजार देते. मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ आलीये माझ्यावर. देवाला नेहमी साकड घालतो की मला उडी मारण्याची बुद्धी देऊ नको. काम नसल्यामुळे मी पोरका आहे, मी एकटा राहतो, माझं असं कोणी नाहीये. मला खूप त्रास होतोय. मी कोणाकडे पैशाची भीक मागत नाही पण कामाची भीक मागतो, मला काम द्या." अशा शब्दांमध्ये मनमोहन यांनी त्यांची अवस्था शेअर केली आहे.

'नटसम्राट', 'छत्रपती ताराराणी' अशा विविध २९ मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी आणि गुजराती रुपेरी पडद्यावरही भूमिका गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर सध्या बिकट परिस्थितीला सामोरं जात आहेत. ७७ वर्षीय मनमोहन माहिमकर मूळचे गिरगावचे. ते पूर्वी राहात असलेल्या सदाशिव लेनमधील जुन्या इमारतीचा पुनर्विकास सुरू असल्याने माहिमकर सध्या मुगभाट लेन परिसरात भाड्याच्या घरात राहतात.

आपली व्यथा मांडताना माहिमकर म्हणाले, ‘दोन वर्षांनी नवीन घराचा ताबा मिळणार आहे. पण, थोरला भाऊ जगदीश आणि वहिनी रेखा माझ्यावर खोली विकण्यासाठी दबाव टाकत आहेत. वहिनी वारंवार धमक्या देत आहे. पोलिसांकडे मदत मागितली. पण, कौटुंबिक प्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले. " मनमोहन त्यांच्या बिकट परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर येतील, अशी सर्वांना आशा आहे.

Web Title: veteran Marathi actor manmohan mahimkar talk about his bad life situtaion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.