सैराट फेम ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 11:09 IST2020-05-25T11:09:13+5:302020-05-25T11:09:20+5:30

चित्रपटसृष्टीत ते  'धुमाळ काका' या नावाने प्रसिद्ध आहेत.

veteran actor ramchandra dhumal passes away gda | सैराट फेम ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन

सैराट फेम ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं पुण्यात निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते.  ते दीर्घकाळापासून आजारी होते. फॅन्ड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या, बोनसाय, छत्रपती शासन, बॅलन्स, वाघेऱ्या अशा अनेक चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमध्ये त्यांनी भूमिका केली होती. चित्रपटसृष्टीत ते  'धुमाळ काका' या नावाने प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रात येणाऱ्या नव्या कालाकारांचे 'धुमाळ काका' मार्गदर्शक होते. 

सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दिकी) वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रामचंद्र धुमाळ यांना खूप उशीरा सिनेमांमध्ये भूमिका करायला मिळाल्या मात्र त्यांनी उशीरा मिळालेल्या संधीचे देखील सोनं केले. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी आपली वेगळी छाप सोडली.
 

Web Title: veteran actor ramchandra dhumal passes away gda