"वर्षा उसगांवकर भयंकरच आगाऊ असेल...", लोकांच्या गैरसमजाबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:40 IST2025-04-02T12:40:19+5:302025-04-02T12:40:48+5:30
Varsha Usgaonkar Misconceptions: वर्षा उसगांवकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजुतीबद्दल सांगितले

"वर्षा उसगांवकर भयंकरच आगाऊ असेल...", लोकांच्या गैरसमजाबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री
नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar). त्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत त्यांनी काम केले आहे. शेवटच्या त्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आणि बिग बॉस मराठी ५ या शोमध्ये दिसल्या होत्या. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजुतीबद्दल सांगितले.
वर्षा उसगांवकर यांनी जयंती वाघधरेने फिल्मसिटी मुंबईसाठी घेतलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांच्याबद्दल सिनेइंडस्ट्रीतील कलाकार आणि लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुतीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, सिनेमातले लोक सुद्धा त्यांना असं वाटतं की मी फार गर्विष्ठ आहे. त्यामुळे थोडासा तो एक गैरसमज लोकांमध्ये होणे साहजिक आहे की वर्षा उसगांवकर म्हणजे फारच गर्विष्ठ असेल आणि ती म्हणजे हसत नाही. ती जास्त भयंकरच आगाऊ असेल किंवा असं थोडासा इंसल्ट करणारी असेल. कदाचित आपण तिला अप्रोच केलं तर फटकून वागणारी असेल की जा जा ऑटोग्राफ काय मागतो... नाही देत जा अशाप्रकारचा थोडासा असेल. थोडाशी वलंयाकित मी होते.
''मी बोलकी फार नाहीये; पण...''
वर्षा उसगांवकर पुढे म्हणाल्या की, हळूहळू जेव्हा वर्ष जात गेली. बरीच वर्षे गेली त्याला काही काही कलाकार सुद्धा म्हणाले, अहो वर्षाताई तुम्ही किती बोलता. मी बोलकी फार नाहीये पण निदान ते म्हणाले की, तुम्ही आपली जी पोझिशन आहे त्याच्याबद्दल असं हे करणं किंवा अगदी मी कोण आहे अमुक तमुक आहे, तुम्ही स्वतःला काहीच समजत नाही. अशा प्रकारच्या मला प्रतिक्रिया मिळाल्या. तुमच्याबद्दल गैरसमज होता. असं हे लोकांनी मला उघडपणे सांगितलेले आहे.