चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:50 IST2025-11-20T16:49:34+5:302025-11-20T16:50:02+5:30

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे. यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होत आहे. 

Various programs organized in Maharashtra to mark the 125th birth anniversary of filmmaker Dr. V. Shantaram | चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

'अयोध्येचा राजा', 'माणूस', 'कुंकू', 'झनक झनक पायल बाजे', 'डॉ. कोटनीस की अमर कहानी', 'दो आँखे बारा हाथ', 'नवरंग', 'पिंजरा’ यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे. यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होत आहे. 

१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये मुंबई व ठाणे येथे होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग असणार आहे तसेच प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या संस्था डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचे विशेष शो आयोजित करणार आहेत.

तसेच या १२५व्या जयंती वर्षानिमित्त गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम निर्मित ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी (१९४६)’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ. व्ही. शांतारामांचे चित्र असलेल्या पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करण्यात येणार आहे.

Web Title : वी. शांताराम की 125वीं जयंती पर महाराष्ट्र में कार्यक्रम आयोजित।

Web Summary : महाराष्ट्र में वी. शांताराम की 125वीं जयंती मनाई जा रही है, जिसके लिए कोल्हापुर, पुणे और मुंबई में साल भर कार्यक्रम होंगे। गोवा फिल्म समारोह में उनकी फिल्म दिखाई जाएगी और डाक टिकट जारी होगा।

Web Title : Events planned in Maharashtra for V. Shantaram's 125th birth anniversary.

Web Summary : Maharashtra celebrates the 125th birth anniversary of filmmaker V. Shantaram with year-long events in Kolhapur, Pune, and Mumbai. Film festivals feature his work, including a special screening at Goa's international film festival. A commemorative postage stamp will also be released.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा