Valentine's Day Special: मानसी नाईकने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 11:45 IST2020-02-14T11:45:09+5:302020-02-14T11:45:41+5:30

काही दिवसांपूर्वी मानसी नाईकने रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते.

Valentine's Day Special: Mansi Naik shared romantic photo with boyfriend, See Photo | Valentine's Day Special: मानसी नाईकने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, See Photos

Valentine's Day Special: मानसी नाईकने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो, See Photos


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईकनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. तसेच ती बऱ्याचदा तिच्या डान्स व फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.  आता तिने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या बॉयफ्रेंडला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत त्या दोघांचा रोमँटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मानसी नाईकने इंस्टाग्रामवर बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे जान प्रदीप खरेरा. आय लव्ह यू. तुझी लढाई ती माझी लढाई. आपण दोघे सामोरे जाऊ. 


काही दिवसांपूर्वी मानसी नाईकने तिच्या वाढदिवसादिवशीच तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलं होतं. तिने प्रेमात असल्याचे सांगून तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला होता.


प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे.मानसी आणि प्रदीप कधीपासून प्रेमात आहेत आणि ते एकमेकांना कसे भेटले, हे अद्याप समजलेले नाही.

मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. 'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले. ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे.


त्याचबरोबर एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचीदेखील ओळख तिने करून दिली आहे.

Web Title: Valentine's Day Special: Mansi Naik shared romantic photo with boyfriend, See Photo