"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:28 IST2025-05-29T09:28:03+5:302025-05-29T09:28:27+5:30

हगवणेंच्या वकिलाकडून कोर्टात अजब युक्तिवाद करण्यात आला. नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असं हगवणेंचे वकील म्हणाले. त्यासोबतच मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरही त्यांनी शिंतोडे उडवले.

vaishnavi hagwane death case marathi actor hemant dhome angry tweet after hagwane lawyer strange argument | "हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला

"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला

राज्यभरात वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी वारंवार होणारा शारीरिक छळ आणि मानसिक जाचाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं. वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. 

यावेळी हगवणेंच्या वकिलाकडून कोर्टात अजब युक्तिवाद करण्यात आला. नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही, असं हगवणेंचे वकील म्हणाले. त्यासोबतच मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरही त्यांनी शिंतोडे उडवले. यानंतर पुन्हा एकदा राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. वकिलाच्या या अजब युक्तिवादानंतर मराठी अभिनेता हेमंत ढोमेने संताप व्यक्त करत X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. "वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे. कठीण आहे!", असं हेमंत ढोमेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

चारित्र्यावर संशय 
 
आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅटिंग सुरू होते. ते पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. वैष्णवीची टेन्डन्सी सुसाइड करण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातूनच तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा रॅट पॉइझन घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची पोलिस कोठडी एक दिवसाने, तर राजेंद्र आणि सुशील यांची पोलिस कोठडी ३१ मेपर्यंत वाढविली.

Web Title: vaishnavi hagwane death case marathi actor hemant dhome angry tweet after hagwane lawyer strange argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.