सफेद रंगाच्या साडीत खुललं वैदहीचे सौंदर्य, फॅन्स म्हणाले, ही मराठीत इंडस्ट्रीतील कतरिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 10:37 IST2019-07-18T10:30:37+5:302019-07-18T10:37:40+5:30

अभिनेत्री वैदही परशुरामीच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.

Vaidehi parshurami share sarees photo on instagram | सफेद रंगाच्या साडीत खुललं वैदहीचे सौंदर्य, फॅन्स म्हणाले, ही मराठीत इंडस्ट्रीतील कतरिना

सफेद रंगाच्या साडीत खुललं वैदहीचे सौंदर्य, फॅन्स म्हणाले, ही मराठीत इंडस्ट्रीतील कतरिना

ठळक मुद्देछोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत

अभिनेत्री वैदही परशुरामीच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.


वैदहीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसतेय. वैदहीने यात सफेद आणि लाल रंगाची साडी परिधान केली आहे. काही तासांच्यात आतच वैदहीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मराठीताल कतरिना अशी कमेंट् या फोटोवर करण्यात आली आहे. 


'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले.तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.  रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.  

Web Title: Vaidehi parshurami share sarees photo on instagram