साडीत खुललं वैदही परशुरामीचे सौंदर्य, फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 07:15 IST2020-01-09T07:15:00+5:302020-01-09T07:15:00+5:30

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

Vaidehi parshurami share her saree photo on instagram | साडीत खुललं वैदही परशुरामीचे सौंदर्य, फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

साडीत खुललं वैदही परशुरामीचे सौंदर्य, फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.


डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.


वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वैदहीने सोशल मीडियावर साडीतला फोटो शेअर केला आहे. साडीत वैदही खूपच सुंदर दिसतेय आहे. तिच्या फॅन्सनी देखील या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. सिम्बा सिनेमात तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना भावली होती.

Web Title: Vaidehi parshurami share her saree photo on instagram