या मराठी अभिनेत्रीचा साडीतला फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, एकदा पाहाच तिचा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 07:15 IST2019-08-01T07:15:00+5:302019-08-01T07:15:00+5:30

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे.

Vaidehi parshurami looks beautiful in saree | या मराठी अभिनेत्रीचा साडीतला फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, एकदा पाहाच तिचा हा फोटो

या मराठी अभिनेत्रीचा साडीतला फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, एकदा पाहाच तिचा हा फोटो

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.

 वैदहीचे अभिनया इतकेच नृत्यावर देखील प्रेम आहे. वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी वैदहीने इन्स्टाग्रामवर एक साडीतला फोटो शेअर केला आहे.

 

या फोटोत वैदहीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. लाल रंगाची साडी वैदहीच्या सौंदर्याला चार चांद लावते आहे.  वैदहीचे सोज्वळ सौंदर्य तिच्या फॅन्सना देखील भावले आहे. त्यांनी ही फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करत आपली पसंती दर्शवली आहे.  एका फॅन्सने तर वैदेहीच्या फोटोवर तू माझी ड्रिम गर्ल असल्याची कमेंट केली आहे.


मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.  बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. सिम्बा सिनेमात तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना भावली होती.  

Web Title: Vaidehi parshurami looks beautiful in saree