बाबो! वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांचा 'लोच्या झाला रे' परदेशात होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:44 IST2022-02-09T18:41:09+5:302022-02-09T18:44:49+5:30

अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस आता परदेशातही लोच्या करायला जाणार आहेत.

Vaidehi Parashurami, Ankush Chaudhary and Siddharth Jadhav's 'Lochya Jhala Re' will be screened abroad | बाबो! वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांचा 'लोच्या झाला रे' परदेशात होणार प्रदर्शित

बाबो! वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांचा 'लोच्या झाला रे' परदेशात होणार प्रदर्शित

रवी अधिकारी दिग्दर्शित 'लोच्या झाला रे'(locha zala re) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अवघ्या महाराष्ट्रात असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, रेशम टिपणीस आता परदेशातही लोच्या करायला जाणार आहेत. परदेशातील प्रेक्षकांच्या मागणीनंतर आता 'लोच्या झाला रे' हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे. ‘लोच्या झाला रे’ यु.एस, यु.ए. ई.सह अन्य देशांमध्ये तीसहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ही सगळी टीम परदेशातही कल्ला करणार आहे. 

 या यशाबद्दल दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता ‘लोच्या झाला रे’ परदेशवारी करणार आहे. आम्हाला अतिशय आनंद होतोय की, परदेशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे.’’ तर मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा म्हणतात, ‘’हा चित्रपट प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. या परदेशी प्रेक्षकांचा मान राखत आम्ही ‘लोच्या झाला रे’ तिथे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला आशा आहे की, तेथील प्रेक्षक असेच भरभरून प्रेम देतील.’’

लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दी एन्टरटेन्मेंट कंपनी व अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश जगताप कार्यकारी निर्माता आहेत.
 

Web Title: Vaidehi Parashurami, Ankush Chaudhary and Siddharth Jadhav's 'Lochya Jhala Re' will be screened abroad